पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या नावाआधी 'साध्वी'; 'तो' शब्द काढण्याची 30 वर्षानंतर मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 10:15 AM2021-10-01T10:15:09+5:302021-10-01T12:32:22+5:30
30 वर्षांमध्ये कोणाच्याही लक्षात आली नव्हती. अनेकांनी याबाबत अर्ज दिले होते
पुणे: शहरातील एका उद्यानाच्या नावामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या आधी साध्वी असा उल्लेख करण्यात आला होता. ही बाब ३० वर्षांनंतर लक्षात आल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. विषेश म्हणजे ही बाब मागील 30 वर्षांमध्ये कोणाच्याही लक्षात आली नव्हती. अनेकांनी याबाबत अर्ज दिले होते. पण त्या नावात काहीच बदल करण्यात आला नव्हता. सध्या हे नाव तात्पुरते पुसण्यात आले आहे. मात्र या उद्यानाच्या नावात बदल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
साध्वी हा शब्द सावित्रीबाई फुले यांच्या नावाआधी असल्यामुळे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी फेसबुकवर आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्यानाच्या नावात साध्वी हा शब्द १९९१ साली लावण्यात आल्याचे सांगितले असल्याचे माहिती सरोदे यांनी दिली.
तीस वर्षांपूर्वी १९९१ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्यानाचा कोनशीला समारंभ पार पडला होता. 1991 साली राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तीस वर्षांनंतर ही चूक लक्षात आली असून त्यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.