Video: पन्नास किलो स्फोटकांच्या ब्लास्टलाही टक्कर देणार; भारतीय सैन्यासाठी कल्याणी M-4 वाहन
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: October 10, 2022 05:07 PM2022-10-10T17:07:30+5:302022-10-10T17:28:55+5:30
संरक्षण क्षेत्रात भारताल आत्मनिर्भर बनविण्यासाठी कल्याणी एम ४ हे वाहन बनविल्याची माहिती
पुणे : भारतीय सैन्यासाठी सुमारे १८ हजार फूट उंचावर कोणत्याही वातावरणात चालणारे आणि टायर खाली ५० किलो स्फोटकांचा ब्लास्ट झाला तरी आतील जवानांना सुरक्षित ठेवणारे वाहन तयार करण्यात आले आहे. हे वाहन संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. संरक्षण क्षेत्रात भारताल आत्मनिर्भर बनविण्यासाठी कल्याणी एम ४ हे वाहन बनविल्याची माहिती भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी दिली आहे.
स्वदेशी बनावटीचे आणि अतिशय मजबूत असणारे वाहन भारत फोर्ज कंपनीने तयार केले आहे. भारतीय सैन्यासाठी हे वाहन सुरक्षा पुरविणारे असून, कल्याणी एम -४ असे त्याचे नाव आहे. मजबूत किल्ला जसा असतो, अगदी त्याचप्रमाणे या वाहनाची सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाची ताकद आणखी वाढणार आहे. ही वाहने सोमवारी भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यासाठी पुण्यातून रवाना करण्यात आली.
भारत फोर्जचे चेअरमन बाबा कल्याणी यांनी या वाहनांचे पूजन मुंढवा येथील त्यांच्या कंपनीत केले आणि त्यानंतर ही वाहने रवाना झाली. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडली असून, त्यात योगदान देण्यासाठी आम्ही ही वाहने तयार केल्याचे कल्याणी यांनी सांगितले. सोमवारी १६ वाहने रवाना झाली आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) मोहिमेसाठी त्यांचा वापर होणार आहे. भारतीय सीमेवर सैनिकांना अत्यंत कडक सुरक्षा देण्याचे काम ही वाहने करतील.
बिपीन रावत यांची कल्पना होती की, जवानांसाठी अतिशय सुरक्षित असे वाहन तयार करावे. त्यांची कल्पना आम्ही प्रत्यक्षात आणली आहे. ही वाहने अतिशय थंड आणि ५० डिग्री सेल्सियस तापमानातही वेगाने चालणार आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे, असे बाबा कल्याणी यांनी सांगितले.
पन्नास किलो स्फोटकांच्या ब्लास्टलाही टक्कर देणार; भारतीय सैन्याची ताकद वाढवणारे खास एम 4 वाहन #IndianArmy#FORCEpic.twitter.com/469KVhYQFm
— Lokmat (@lokmat) October 10, 2022
कल्याणी ‘एम-४’ वाहनाची वैशिष्टे
- वाळवंट आणि पर्वतीय प्रदेशातही चालणार
- संपूर्ण स्वदेशी बनावटीचे वाहन
- उणे २० अंश सेल्सियस ते ५० अंश सेल्सियस तापमाना चालणार
- दहा जवानांना अत्याधुनक शस्त्रासह वाहन क्षमता
- बाॅम्ब प्रतिराेधक क्षमता
-११० किलाेमीटर प्रतितास वेग क्षमता