‘त्यांच्या ’ मुळेच आपण सर्व सुरक्षित : राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 08:33 PM2018-11-26T20:33:45+5:302018-11-26T20:34:20+5:30

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी दुर्लक्ष केले तर काय काय भोगावे लागू शकते याचा अंदाज पण कुणी करू शकणार नाही.

'safeguarding' due to police : Raj Thackeray | ‘त्यांच्या ’ मुळेच आपण सर्व सुरक्षित : राज ठाकरे 

‘त्यांच्या ’ मुळेच आपण सर्व सुरक्षित : राज ठाकरे 

googlenewsNext
ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या हस्ते ‘प्राईड आॅफ महाराष्ट्रीय मंडळ’ पुरस्कार प्रदान

पुणे : एका पक्षाचा नेता असल्याने पोलिसांशी कायमच संपर्क येतो. तुम्हीही जरा पोलिसांशी संबंध ठेवून बघा, मात्र त्यासाठी गुन्हे अंगावर घ्यावे लागतात अशा शब्दातं पोलिसांबरोबरच्या ’राज’कीय नात्याचे गमक  खास ‘ठाकरे’ शैलीत उपस्थितांसमोर उलगडले ...तरीही माझ्या मनात पोलिसांबददल नितांत आदर आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी दुर्लक्ष केले तर काय काय भोगावे लागू शकते याचा अंदाज पण कुणी करू शकणार नाही. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात चार पोलीस अधिका-यांना जीव गमवावा लागला...आज मुंबईमध्ये गाड्या भरून बाहेरून लोंढे येत आहेत, अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत...अशा भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्यकर्तुत्वाला सलाम केला. 
महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस कै. रमेश दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रीय मंडळातर्फे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘प्राईड आॅफ महाराष्ट्रीय मंडळ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ठाकरे बोलत होते. फणसळकर यांनी पुरस्काराच्या रकमेत भर घालून 21 हजार रूपये संस्थेला देणगी दिली. 
याप्रसंगी पुरस्कार प्रदान समारंभ  माजी पोलीस आयुक्त श्रीकांत बापट, एअरमार्शल ( निवृत्त) भूषण गोखले, मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपान कांगणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 
महाराष्ट्रातल्या अमराठी भाषिक पोलीस दलामध्ये विवेक फणसळकर यांच्यासारख्या मराठमोळ्या पोलिसांचा अभिमान आहे, अशा शब्दातं फणसळकर यांच्याविषयी ठाकरे यांनी गौरवोद्वगार काढले. अचानक जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा लगेचच पोलिसांना दूषण लावली जातात. पोलिसांना काय तर पैसे खायचे असतात, पण अख्खा देश पैसे खातो त्याचे काय? तुम्ही सणवार साजरे करीत असता तेव्हा हातात लाठी घेऊन ते तुमच्या  सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडत असतात.  ते दिसत नाही का? असे खडे बोलही त्यांनी जनतेला सुनावले. 
सत्काराला उत्तर देताना एखादी स्त्री माहेरी आल्यावर जशी भावना होते तशी आज अवस्था  झाली आहे. प्रेम आणि वात्स्यल्याचे वातावरण अनुभवत आहे. या शाळेने संस्थेने खूप भरभरून दिले.नैसर्गिकरित्या संस्थेत राहिलो अडवलं, बडवल आणि घडवलं आहे अशा भावनिक बोलातून संस्था आणि शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या शिक्षकांचे वाईट वाटते श्रीमुखात भडकविण्याचा त्यांचा नैसर्गिक अधिकार हिरावून घेतला आहे,यामुळे  मुलांना कधीच शिक्षकांचे प्रेम  काय असते ते कळणार नाही. मी ही शाळा, शिक्षिका विद्यार्थी यांचा खूप ऋणी आहे. हे ऋण फेडता येणार नाहीत. हा पुरस्कार पोलीस बांधवांना अर्पण करत असल्याचे ते म्हणाले. 
श्रीकांत बापट म्हणाले, पैशात गुंतवणूक कशी कारायची हे सगळे सांगतात पण आरोग्यामध्ये गुंतवणूक कशी करायची हे संस्थेने शिकविले हे मंडळ म्हणजे संस्काराचे विद्यापीठ आहे. 
भूषण गोखले यांनी  संस्थेकडून सक्षम नागरिक मिळवून देण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. 

Web Title: 'safeguarding' due to police : Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.