सुरक्षितता अन् जागरूकता वाढली : मिलिंद काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:02+5:302021-08-12T04:14:02+5:30
पुणे : कॉसमॉस बँकेवरील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याची दखल सर्वच पातळीवर घेतली गेली. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुरक्षेबाबत अधिक कडक ...
पुणे : कॉसमॉस बँकेवरील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याची दखल सर्वच पातळीवर घेतली गेली. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुरक्षेबाबत अधिक कडक भूमिका घेऊन याबाबत देशभरातील सर्व बँकांना सुरक्षा घेण्याबाबत वेगवेगळी ऑडिट लागू केले. कॉसमॉस बँकही पुन्हा असे होऊ नये, यासाठी जनजागृती आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेत असते. कोणी असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अलर्ट मिळावा, अशी सिस्टिम तयार करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांच्या सर्व वाटा बंद करण्याचा या प्रकरणानंतर प्रयत्न करण्यात आला आहे.
हाँगकाँगच्या बँकेत गोठविण्यात आलेले पावणेसहा कोटी रुपये बँकेला परत मिळाले आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी या प्रकरणात काही जणांना अटक केल्याची माहिती बँकेला मिळाली. मात्र, त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेची वसुली अद्याप काहीही झालेली नाही, असे कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांनी सांगितले.
....
* कॉसमॉस बँकेवर ११ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत २ वेळा व १३ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता सायबर हल्ला झाला. एटीएम सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी व्हिसा व रूपे डेबिट कार्ड ग्राहकांचा डाटा चोरला.
* ११ ऑगस्टला ४५० इंटरनॅशनल व्हिसा डेबिट कार्डांद्वारे सुमारे ७८ कोटी भारताबाहेर ट्रान्सफर करण्यात आले. केवळ २ तास १२ मिनिटांत २१ देशातील एटीएम व इतर ठिकाणी १२ हजारांपेक्षा जास्त व्यवहार केले.
* दुसऱ्या वेळेस ४०० कार्ड्सच्या माहितीवरून २,८४९ व्यवहार करत २ कोटी ५० लाख रुपये भारतातील १७ शहरांमधून काढले गेले. १३ ऑगस्टला १३.९२ कोटी हाँगकाँगच्या हँगसेंग बँकेत एएलएम ट्रेडिंग लि.च्या खात्यावर वळते केले. त्यापैकी आतापर्यंत पावणेसहा कोटी रुपये बँकेला परत मिळू शकले आहेत़