महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना

By admin | Published: May 12, 2017 05:37 AM2017-05-12T05:37:25+5:302017-05-12T05:37:25+5:30

अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर नोकरी करतात. नयना पुजारी खटल्यातील योग्य निकालामुळे या नोकरी करीत स्वाभिमानी

Safety in women | महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना

महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर नोकरी करतात. नयना पुजारी खटल्यातील योग्य निकालामुळे या नोकरी करीत स्वाभिमानी आयुष्य जगणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटेल, असा विश्वास ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांनी व्यक्त केला.
नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खून खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळातील महिलांतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. दीपा ससाणे, वंदना मोहिते, नयना नाईक, विद्या मोहिते, नलिनी जाधव, मेधा पोटेकर, निशा करपे, रूपाली मेहता, मंगला गोलांडे, शकुंतला मेंडके यांसह महिला या वेळी उपस्थित होत्या. पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांचा कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.
अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, ‘‘नयना पुजारी यांची केस अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची होती. केस जेव्हा हातात आली, त्या वेळी आरोपींना शिक्षा होईल का, अशी शंका होती. या केसमध्ये बऱ्याच कमतरता होत्या. बऱ्याच परिश्रमानंतर योग्य न्याय मिळू शकला. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे साहाय्य आणि पोलीस दलाच्या साहाय्याने केस जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला. या केसचा निकाल लागण्यासाठी उशीर झाला, परंतु योग्य न्याय मिळाल्याचे समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Safety in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.