गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले; वर्षभरात करडई ५० रुपयांनी महाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 04:20 PM2021-12-27T16:20:57+5:302021-12-27T16:27:54+5:30

पुणे : राज्यातील शेतकरी करडईचे उत्पादन मुख्य पीक म्हणून घेत नाही. ज्या भागात ज्वारीचे उत्पादन होते, त्याच भागात करडईचे ...

saffron is expensive by 50 rupees in a year edible oil price hike | गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले; वर्षभरात करडई ५० रुपयांनी महाग!

गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले; वर्षभरात करडई ५० रुपयांनी महाग!

Next

पुणे : राज्यातील शेतकरी करडईचे उत्पादन मुख्य पीक म्हणून घेत नाही. ज्या भागात ज्वारीचे उत्पादन होते, त्याच भागात करडईचे उत्पादन होते. मात्र, त्याचे प्रमाण अल्प आहे. पुणे शहरात वर्षभरातील केवळ फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांतच करडईचे तेल विशेषकरून मिळते. या वर्षाच्या सुरुवातीला करडईच्या तेलाचे दर १५० ते १८० रुपये होते. ते आता २२० ते २४० रुपयांपर्यंत वाढले आहेत. गोडतेलाचे करडई तेलाचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. शहरात करडईचे तेल मिळत नाही. इतर तेलांपेक्षा करडईचे तेल महाग असल्याने या तेलाला प्रतिलिटर २२५ रुपयांपेक्षा जास्त दर मिळतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या महिन्यात काय होते दर? (प्रतिकिलोचे दर)

तेल       १५ ऑगस्टचे दर      १५ ऑक्टोबरचे दर    १५ डिसेंबरचे दर

सोयाबीन       १३०-१६०,           ११५-१४५,              १२०-१५०

पाम                १३०-१६०,          ११५-१४५,                 ११५-१४५

सूर्यफूल            १४०-१७५,            १२५-१६०,              १३०-१६०

शेंगदाणा            १४०-१७५,            १२५-१६०,             १३०-१७०

शेंगदाणा, करडई म्हणून महाग

मागील काही दिवसांत शेंगदाण्याचे दर १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेंगदाणा तेलाचेही दर वाढले आहेत.; तर करडईचे पीक हे मुख्य पीक म्हणून शेतकरी उत्पादन घेत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा किंवा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ज्या भागात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते, त्याच भागात करडईचे उत्पादन होते. मात्र, त्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. बाजारातील मागणीप्रमाणे तेवढा पुरवठा होतच नाही. त्यामुळे साहजिकच याचे दर जास्त दआहेत.

- व्यापारी, रमेश डांगी

सोयाबीन, सूर्यफूल म्हणून झाले स्वस्त

पाम, सूर्यफूल आणि सोयाबिन, सूर्यफूल तेलासोबतच रिफाईंड तेलावरील मूळ कस्टम ड्यूटी रद्द केली आहे. आयात कर आणि उपकरही कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मागील तीन महिन्यांपासून घट झाली आहे.

- कन्हैयालाल गुजराथी, व्यापारी,

करडईचे तेल एकतर वर्षातून एक किंवा दोन महिनेच मिळते. उत्पादन कमी असल्याने इतर वेळेस ते मिळतच नाही. त्याचबरोबर पाम, सोयाबीन, शेंगदाणा सूर्यफूल इतर तेलांपेक्षा ते खूपच महाग असते. आमचे महिन्याचे बजेट कोलमडते. त्यामुळे करडईचे तेल आम्ही दैनंदिन वापरतच नाही.

- वैष्णवी दरगुडे, गृहिणी

Web Title: saffron is expensive by 50 rupees in a year edible oil price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.