सागर गावडे, मंगेश ठाकूर लढणार

By admin | Published: November 22, 2014 11:44 PM2014-11-22T23:44:38+5:302014-11-22T23:44:38+5:30

कोवळे ऊन.. पायाखाली लाल माती.. तापलेले शरीर.. हाताला हात भिडला..

Sagar Gawde, Mangesh Thakor will fight for | सागर गावडे, मंगेश ठाकूर लढणार

सागर गावडे, मंगेश ठाकूर लढणार

Next
शेलपिंपळव : कोवळे ऊन.. पायाखाली लाल माती.. तापलेले शरीर.. हाताला हात भिडला.. आणि टाळ्या अन् जल्लोष.. अशा चैतन्यपूर्ण वातावरणात सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथे खेड तालुका चाचणी कुस्ती स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. खेड तालुक्यातून महाराष्ट्र केसरी गादी स्पर्धेसाठी सागर गावडे, तर माती विभागात मंगेश ठाकूर या मल्लांची निवड झाली असून, कुमार महाराष्ट्र केसरीसाठी आळंदी-देवाची येथील जोग महाराज व्यायामशाळेतील आदर्श गुंड या मल्लाला खेळण्याची संधी मिळणार आहे. 
सिद्धेगव्हाण येथील कै. गोविंद साबळे व कै. सोपानराव मोरे यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या शंभुराजे आखाडा मैदानात या चाचणी स्पर्धा पार पडल्या. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन च:होलीचे प्रसिद्ध ज्येष्ठ मल्ल बाबासाहेब तापकीर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, किल्लेदार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मंगेश प:हाड, आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष व चित्रपट निर्माते अविनाश मोहिते- पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शशिकांत मोरे, अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे चाकण शहराध्यक्ष पै. अभिजित जाधव, डी. डी. मोहिते -पाटील पतसंस्थेचे संचालक पै. अतुल कुटे, उद्योजक सुनील शितोळे, हनुमंत कड, पै. नागेश कराळे, माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष साबळे, तांबोळी सर, प्रकाश मोरे, पोलीस पाटील वाल्मीक साबळे, सत्यवान काळे, शिवाजी मोरे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष मारुती वाडेकर, रामभाऊ वाडेकर, खेड तालुका बैलगाडा विमा कंपनीचे संचालक पंकजबापू हरगुडे, माजी सरपंच राजाराम साबळे, बाळासाहेब चौधरी, विलास चौधरी, नितीन गाडे, जीवन साबळे, दिलीप मोरे, शिवराम साबळे आदींसह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
याप्रसंगी रंगनाथ वाडेकर, यशवंत मडके, सखाराम वाडेकर, महादेव साबळे, मोहन साबळे, विश्वनाथ धाऊत्रे, ह.भ.प. प्रभाकर साबळे, दादाभाऊ पानसरे, टिळकराव उगले, सदाशिव साबळे, विनायक पवार आदींसह अन्य मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै. अनिल साबळे, उमेश मोरे, योगेश मोरे, सरपंच शशिकांत मोरे, प्रकाश चौधरी, अनिल पवार, रमेश थोरात, भानुदास मोरे, विजय पवार, विशाल पवार, दादा मोरे, दत्ता गाडे, सोमनाथ धाऊत्रे, वैभव साबळे, गणोश पवार आदी तरुण कार्यकत्र्याचे मोलाचे योगदान लाभले. स्पर्धेत पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, काळूराम लोखंडे, मारुती सातव यांनी काम पहिले, तर सत्यवान काळे यांनी निवेदक म्हणून काम केले. 
(वार्ताहर)
 
4कुस्ती या खेळाला ग्रामीण भागात अधिक चालना मिळावी, या उद्देशाने सिद्धेगव्हाण, बहुळ गावातील ज्येष्ठ, तसेच नामांकित मल्लांची गावातून भव्य मिरवणूक काढून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आल. या वेळी जुन्या- जाणकार मल्लांनी तरुण मल्लांना शाबासकी देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या मिरवणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणात ज्येष्ठ मल्लांचा सहभाग मिळाला होता. 

 

Web Title: Sagar Gawde, Mangesh Thakor will fight for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.