सहका:याच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By admin | Published: November 30, 2014 12:37 AM2014-11-30T00:37:59+5:302014-11-30T00:37:59+5:30
काम करत नसल्याची चुगली केल्याचा राग मनात ठेवून सहकारी कामगाराचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची न्यायालयाने शिक्षा सुनावली.
Next
पुणो : काम करत नसल्याची चुगली केल्याचा राग मनात ठेवून सहकारी कामगाराचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची न्यायालयाने शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एन. दक्कितवार यांनी हा आदेश दिला आहे.
मधुरातसिंह उर्फ राजा दरोगसिंह भदौरिया (वय 3क्, रा. पिंपरी, मूळ मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सुरेंद्र चतुरीप्रसाद (वय 27) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत फेकू रामजी साहनी (वय 35, रा. पिंपरी, मूळ गोरखपूर, उत्तर प्रदेश ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 29 मे 2क्12 रोजी रात्री 9.3क्च्या सुमारास पिंपरी एमआयडीसी येथील प्रजापती फाउंडरी या कंपनीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. रमेश घोरपडे यांनी काम पाहिले. भदौरिया, साहनी आणि प्रसाद हे तिघे प्रजापती फाउंडरी कंपनीत कामाला होते. भदौरिया हा रात्री कामावर असताना झोपतो, पाणी भरत नाही, अशी चुगली प्रसादने मालकाकडे केली. या कारणावरून भदौरिया चिडला होता. घटनेच्या दिवशी प्रसाद आणि फिर्यादी साहनी जेवण करत बसले होते. त्या वेळी वडिलांचा शस्त्रपरवाना असलेली 12 बोरची बंदूक घेऊन भदौरिया तेथे आला. पुणो पोलिसांचा बेकायदेशीरपणो शस्त्र बाळगण्याचा हुकूम असताना बंदूक घेऊन भदौरिया याने सुरेंद्रच्या पोटाजवळ बंदूक लावून शिवीगाळ केली. त्यानंतर ‘चुगली करता है क्या’ म्हणत गोळी झाडून सुरेंद्रचा खून केला. त्यानंतर कंपनीतील इतर कामगार, भदौरिया याला पकडण्यात आले. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून भदौरिया तेथून पळून गेला होता. याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)