साहेब, इंदापूर तालुक्याला तुमच्या एका कॉलची नितांत गरज : राष्ट्रवादीच्या नेत्याची शरद पवारांना आर्तहाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:53 PM2021-05-21T20:53:30+5:302021-05-21T21:06:16+5:30

फक्त पवारसाहेब आहेत तेच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकतील....

Saheb, Indapur needs only one of your calls: NCP leader request to Sharad Pawar | साहेब, इंदापूर तालुक्याला तुमच्या एका कॉलची नितांत गरज : राष्ट्रवादीच्या नेत्याची शरद पवारांना आर्तहाक

साहेब, इंदापूर तालुक्याला तुमच्या एका कॉलची नितांत गरज : राष्ट्रवादीच्या नेत्याची शरद पवारांना आर्तहाक

Next

इंदापूर : साहेब, तुम्ही दिल्लीला फोन केला,आणि खताच्या किमती कमी झाल्या. तसाच एक आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना एक फोन करा आणि आम्हाला हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवून द्या.अशी आर्त हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिली आहे.

यासंदर्भात माहिती देताना युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत तरंगे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक दिल्लीला फोन केलातर खताच्या किमती वठणीवर आल्या.दिल्लीत तर भाजपचे सरकार आहे. परंतु,राज्यात तर शरद पवारांच्या पुढाकाराने बनवलेले महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या एका कॉलची इंदापूर तालुक्याला नितांत गरज आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे व आगामी काळात देखील त्याच पद्धतीने उभा राहणार आहे, अशी ग्वाही डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी दिली.

शासकीय स्तरावरूनच इंदापूर तालुक्याला पुण्यातून येणारे पाच टीएमसी सांडपाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय झाला होता.साठ गावातील शेतकरी आपण हा जो निर्णय दिला होता.या निर्णयामुळे कोरोनाची महामारी असताना देखील पाणी मिळणार या आशेच्या किरणाने शेतकरी खुश होता. मात्र, आपल्याच पक्षाचे जलसंपदामंत्री अचानकच सोलापूर जिल्ह्याच्या दबावाला बळी पडून,चुकीच्या गोष्टी ऐकून इंदापूर तालुक्याला मिळणारे पाच टीएमसी पाणी योजना स्थगित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर विरजण पडले आहे. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवारसाहेब आहेत तेच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकतील असाही विश्वास डॉ. शशिकांत तरंगे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Saheb, Indapur needs only one of your calls: NCP leader request to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.