सई पवार ‘एनएमएमएस’ परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:59+5:302021-08-22T04:12:59+5:30

परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय बारामती : बारामती येथील राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल विद्यालय, बारामती या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक व ...

Sai Pawar is second in the district in 'NMMS' examination | सई पवार ‘एनएमएमएस’ परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय

सई पवार ‘एनएमएमएस’ परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय

googlenewsNext

परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय

बारामती : बारामती येथील राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल विद्यालय, बारामती या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक व दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) घवघवीत यश संपादन केले आहे.

या विद्यालयातील सई अरविंद पवार हिने १५४ गुण मिळवत पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर कदम स्वानंद किशोर व कळसाईत ओम दत्तात्रय याही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. या तिन्ही विद्यार्थांना ९ वी ते १२ वी पर्यंत प्रतिवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे एकूण ४८ हजार रुपये प्रत्येकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील ८ वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विभागप्रमुख सोमनाथ मिंड, सहाय्यक विभागप्रमुख विकास जाधव व सर्व विषय शिक्षक यांचे अभिनंदन स्थानीय स्कूल कमिटी सदस्य सदाशिव सातव, विद्यालयाचे प्रा. राजेंद्र काकडे, उपमुख्याध्यापक देवडे, पर्यवेक्षक जाधव, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद बंडू पवार, अर्जुन मलगुंडे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Sai Pawar is second in the district in 'NMMS' examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.