हरिनामाच्या जयघोषात संत मुक्ताबाई तेजोविलन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:30+5:302021-06-06T04:09:30+5:30

याप्रसंगी संत सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी, प्रसिद्ध कीर्तनकार हभप संभाजी महाराज बडदे, सुधाकर गिरमे, पालखी सोहळ्याचे चोपदार ...

Saint Muktabai Tejovilan ceremony in the chanting of Harinama | हरिनामाच्या जयघोषात संत मुक्ताबाई तेजोविलन सोहळा

हरिनामाच्या जयघोषात संत मुक्ताबाई तेजोविलन सोहळा

Next

याप्रसंगी संत सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी, प्रसिद्ध कीर्तनकार हभप संभाजी महाराज बडदे, सुधाकर गिरमे, पालखी सोहळ्याचे चोपदार सिद्धेश शिंदे, बंटी नाना जगताप, ओंकार निरगुडे, मोहन उरसळ, नितीन जगताप आदी उपस्थित होते.

शुक्रवारी पहाटे नित्य नियमाप्रमाणे मंदिरात समाधीची महापूजा करून काकडा आरती घेण्यात आली. त्यानंतर संत मुक्ताबाई महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी ११ वा. टाळमृदंगाचा गजर करीत संगीत भजन सादर करण्यात आले. दुपारी बरोबर १२ वा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम या नावाचा जयघोष करीत प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर दुपारी सासवड ग्रामस्थांच्या वतीने संत सोपानदेव महाराज समाधीस चंदनउटी साकारण्यात आली. त्यानंतर मोठ्या उत्साहात मुक्ताबाई तेजोविलन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

०४ सासवड

संत मुक्ताबाई महाराज तेजोविलन सोहळ्यानिमित्त प्रतिमापूजन करून आरती करताना देवस्थानचे विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी व मान्यवर.

Web Title: Saint Muktabai Tejovilan ceremony in the chanting of Harinama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.