संतांची सेवा हाच खरा धर्म : प्रतीकसागर महाराज
By admin | Published: November 16, 2014 12:02 AM2014-11-16T00:02:01+5:302014-11-16T00:02:01+5:30
संतांची मनोभावे सेवा करा हाच खरा मानव धर्म आहे.
Next
दौंड शहर : प्रतीकसागर महाराजांचे बारामती नगरीकडे प्रस्थान
दौंड : संतांची मनोभावे सेवा करा हाच खरा मानव धर्म आहे. तेव्हा मनात भाव ठेऊन संताची पूजा करा, की जेणो करुन माणसाच्या जीवनात आनंद आणि नवचैतन्य निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही. अशी संतवाणी मुनीश्री 108 प्रतीकसागरजी महाराज यांनी भाविकांना सत्संग सोहळ्यात दिली.
दरम्यान सर्वधर्मीय सत्संग सोहळ्याची सांगता होऊन प्रतीकसागरजी महाराज यांचे दौंड नगरीतून बारामतीकडे प्रस्थान झाले. येथील सुवीरकुंज येथून महाराजांचे प्रस्थान होण्यापूर्वी महाराजांची भाविकांनी पूजा केली. त्यानंतर सवाद्य प्रतीकसागरजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत आग्रभागी घोडे होते. ङोंडे, ढोल-ताशे, प्रतीकसागरजी महाराज की जय या जयघोषणोने अवघा परिसर दुमदुमला होता, तर मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी प्रतीकसागरजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. या मिरवणुकीत मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चैतन्य लॉन येथे मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर या ठिकाणी भाविकांना आर्शीवाद देताना प्रतीकसागरजी महाराज म्हणाले, की स्नेहाचे संबंध रक्ताच्या नात्या पेक्षा श्रेष्ठ असतात. त्यानुसार गुरु आणि शिष्याचे नाते अतुट असते.
परिणामी समाजातील प्रत्येक घटकाने गुरुचे पूजन करणो महत्त्वाचे आहे.
या वेळी सुशील शहा यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक तुषार दोशी यांनी करुन मंगलचरण टीना वागजकर यांनी गायीले. तसेच सायली शहा यांनी भक्तीगीत गायन केले. (वार्ताहर)
दौंडची श्रध्दा आणि भक्ती विसरणार नाही
4सत्संगाच्या सांगतावेळी प्रतीकसागरजी महाराज दौंड शहरातील भाविकांच्या श्रद्धे पोटी भाऊक झाले होते. या वेळी ते म्हणाले, की मी जरी शरीराने दौंड नगरीतून जात असलो, तरी आयुष्यभर माझी श्रद्धा या नगरीवर राहील. तेव्हा दौंडची श्रद्धा आणि भक्ती मी कधीही विसरणार नाही.