नाट्यगृहाचा पडदा उघण्यासाठी नटराजाकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:04+5:302021-06-27T04:08:04+5:30

पुणे: बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे कलाकारांचा श्वास... तिसरी घंटा...प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट...उत्स्फूर्त दाद...या सर्व गोष्टींची कलाकार मंडळी आतुरतेने वाट पाहात असतात. ...

Sakade to Nataraja to open the curtain of the theater | नाट्यगृहाचा पडदा उघण्यासाठी नटराजाकडे साकडे

नाट्यगृहाचा पडदा उघण्यासाठी नटराजाकडे साकडे

Next

पुणे: बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे कलाकारांचा श्वास... तिसरी घंटा...प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट...उत्स्फूर्त दाद...या सर्व गोष्टींची कलाकार मंडळी आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र, कोरोनामुळे नाट्यगृह बंद असल्याने कलाकारांसाठी जीवनदायी असलेल्या लाडक्या नाट्यगृहाचा वर्धापन दिन सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याची वेळ आली. शनिवारी (दि.२६) सकाळी बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करीत नाट्यगृहाचा पडदा लवकरात लवकर उघडावा, असे साकडे कलाकार मंडळींनी नटराजाला घातले आहे.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम झाला. या वेळी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, जेष्ठ अभिनेत्री रजनी भट, अभिनेते विजय पटवर्धन, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते, निर्माते दत्ता दळवी, शशी कोठावळे, सुमित कॅसेटचे सुभाष परदेशी, कलाकेंद्राचे अशोक जाधव, अण्णा गुंजाळ, सुनील महाजन, जतीन पांडे, प्रकाश पायगुडे, योगेश देशमुख,योगेश सुपेकर नाट्य चित्रपट परिवारातील मोजकेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यांनी एकत्रित येऊन केक कापून बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा केला.

सुनीता वाडेकर यांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

वर्धापनदिनाच्या आठवणींना उजाळा देताना मेघराज राजेभोसले म्हणाले की, बालगंधर्व परिवारातर्फे रंग मंदिराचा वर्धापन दिन १५ वर्षे साजरा केला जातो. हा सोहळा तीन दिवस साजरा होतो. हा सोहळा म्हणजे पुण्यातील सर्व कलाप्रेमींसाठी एक पर्वणी असते.

या वेळी राजेभोसले यांनी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रिकामे गाळे गरजू कलाकारांना नाममात्र शुल्कात भाडे तत्त्वावर देण्यात यावे, तसेच कलाकारांना शहरी-गरीब योजनेचा थेट लाभ मिळावा तसेच छोटे खाणी स्वरुपात महानगर पालिकेच्या हद्दीत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही केली.

----------------------------------------------

Web Title: Sakade to Nataraja to open the curtain of the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.