महिलांसाठी सखी कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:38+5:302021-03-08T04:12:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महिला या आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांना मासिक पाळी दरम्यानही काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महिला या आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांना मासिक पाळी दरम्यानही काम करावे लागत असताना त्यांना अनेक शारीरिक त्रास तसेच मानसिक बदलवातून जावे लागते. अशा वेळी त्यांना सुट्टी घेणे शक्य नसल्याने त्यांना या काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयाबरोबरच सर्व पंचायत समित्यांममध्ये जागतिक महिला दिनाच्या आैचित्यावर महिलांसाठी सखी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षात त्यांना मासिक पाळी दरम्यान आराम करता येणार आहे.
जिल्हा परिषदेत तसेच पंचायत समितीत महिलांना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते. याबाबत महिला कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. त्या अनुशंगाने अनेक तक्रारी तसेच समस्यां महिला कर्मचाऱ्यांनी मांडल्या होत्या. महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात काम करणे शक्य व्हावे, यासाठी सदस्य कक्ष उभारण्यात यावा, महिला कर्मचाऱ्यांसाठी तक्रारपेटी असावी, येण्याजाण्यासाठी वाहतूक व्यवस्था असावी, महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोनदा आरोग्य शिबिर अयोजित करावे, जिल्हा परिषद आवारात पाळणाघर, महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह अशा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ याबाबत कारवायी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार जिल्हा परिषदेत आणि सर्व पंचायत समित्यात हे कक्ष उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कक्ष नव्हते त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करून ते बांधण्यात आले आहेत. या सर्व कक्षांचे उद्घाटन जागतिक महिलादिनानिमत्त सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. उपध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती, प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर यांनीही हा कक्ष उभारणीसाठी प्रोत्साहन दिले
चौकट
असा असणार कक्ष
या सदस्य कक्षात महिलांसाठी तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. मासिकपाळी दरम्यान आराम करता यावा या साठी बेड, सोफा, टेबल, खुर्ची फॅन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिन इंन्सीनरेटर, प्रथोमोपचार पेटी, संगणक असणार आहे. या खोलीत स्वच्छतागृहांचीही व्यवस्था असणार आहे. स्थानिक बचत गट अथवा महिला दुकानदारांच्या साह्याने योग्य किमतीत काही खाद्यपदार्थही या कक्षात उपलबद्ध करून दिले जाणार आहे.
कोट
जिल्हा परिषद मुख्यालयात असणाऱ्या महिला कर्मचारी तसेच पंचायत समितीतील महिला कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वात मोठी गैरसोय त्यांची मासिक पाळी कालावधी दरम्यान होते. त्यांची ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी महिला सखी कक्ष उपयोगी ठरणार आहे. - निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
चौकट
जिल्ह्यातील बारामती, भोर, दाैंड, हवेली, इंदापुर, जुन्नर, खेड, शिरूर, वेल्हा, आंबेगाव पंचायत समितीतही हे कक्ष उभारण्यात आले आहे. वरील सर्व केंद्राचे उद्घाटन सोमवारी होणार आहे तर आंबेगाव तालुक्यातील कक्षाचे उद्घाटन दोन दिवसांनंतर करण्यात येणार आहे.