चेतन भगतसमवेत रंगणार सखींच्या गप्पा

By Admin | Published: October 6, 2016 03:56 AM2016-10-06T03:56:49+5:302016-10-06T03:56:49+5:30

प्रख्यात लेखक चेतन भगत यांच्यासमवेत सखी मंचच्या सदस्यांना गप्पांची संधी मिळणार आहे. लोकमततर्फे आयोजित या कार्यक्रमाचे

Sakhi's chat with Chetan Bhagat | चेतन भगतसमवेत रंगणार सखींच्या गप्पा

चेतन भगतसमवेत रंगणार सखींच्या गप्पा

googlenewsNext

पुणे : प्रख्यात लेखक चेतन भगत यांच्यासमवेत सखी मंचच्या सदस्यांना गप्पांची संधी मिळणार आहे.
लोकमततर्फे आयोजित या कार्यक्रमाचे केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि.च्या सहयोगाने व औदी हेसह प्रायोजक लग्झरी पार्टनर आहेत. सहज, साध्या, सोप्या मांडणीतून थेट हृदयाला हात घालणारे लेखन करणारे प्रख्यात लेखक चेतन भगत गुरुवारी (दि. ६) सखींसमवेत दिलखुलास गप्पांमध्ये रंगणार आहेत. लोकमत सखी प्रिव्हीलेज क्लबच्या माध्यमातून या वैशिष्ट्यपूर्ण अशा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल वेस्ट इन येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रामध्ये कर्तृत्व प्रस्थापित केलेल्या नामवंत २०० महिला या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘सिस्टरहूड अनफोल्डेड’ या विषयावर चेतन भगत महिलांशी संवाद साधतील, तसेच त्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरेही देतील. चेतन भगत हे केवळ लेखक नसून एक स्टाईल आयकॉन आहेत. आघाडीचा व नव्या पिढीचा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणूनही ते सुपरिचित आहेत.
फाईव्ह पॉर्इंट समवन, वन नाईट अ‍ॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स आॅफ माय लाईफ, मेकिंग इंडिया आॅसम, हाफ गर्लफ्रेंड ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलिवूडमध्ये थ्री इडियट्स, काय पो छे, टू स्टेटस असे गाजलेले चित्रपटही बनलेले आहेत. (प्रतिनिधी)

४या दिलखुलास चर्चेच्या माध्यमातून स्त्रियांविषयीचे त्यांचे विचार आणि नव्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले अंतरंग उलगडले जाणार आहेत. हा कार्यक्रम केसरी टूर्सने प्रायोजित केलेला असून लक्झरी पार्टनर आॅडी आहेत. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून निमंत्रण पत्रिका असणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल.

Web Title: Sakhi's chat with Chetan Bhagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.