लोणी काळभोरला बनावट औषधाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:42+5:302021-07-16T04:08:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : बनावट औषधांची रुग्णास विक्री करून हे औषध कोठून खरेदी केले व कोणाला विकले ...

Sale of counterfeit medicine for a long time | लोणी काळभोरला बनावट औषधाची विक्री

लोणी काळभोरला बनावट औषधाची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : बनावट औषधांची रुग्णास विक्री करून हे औषध कोठून खरेदी केले व कोणाला विकले याबाबत अन्न व औषध प्रशासनाला खुलासा न देता व खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. हे बनावट औषध रुग्णाला विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एकामेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून तब्बल १३ लाख १२ हजार १२४ रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली आहेत.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक श्रृतिका कमसिंग जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सार्थक एन्टरप्रायजेसचे (स. नं. ३७/१/२ मिळकत क्रमांक ३५२१ तळमजळा दुर्गामाता मंदिराजवळ कात्रज बायपास रोड, मंतरवाडी, उरुळी देवाची, ता. हवेली) मालक गणेश शंकरराव कोल्हे (सहारा प्रेस्टीज, स. नं. १७७, सासवड रोड, फुरसुंगी, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोली. निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक एन्टरप्रायजेस येथून इम्युअल ५ एमजी, बीएनओ आडी या बनावट औषध बाजारात विक्री होत असल्याची तक्रार ठाणे येथील अन्न व औषध कार्यालकाकडून पोलिसांना मिळाली होती. औषध निरीक्षक माहुले व डोंगलीकर यांना पुण्यातील फुरसुंगी येथील सार्थक एन्टरप्रायजेस येथे बनावट औषधाचा साठा प्राप्त झाला होता. त्याबद्दल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानसुार औषध निरीक्षक महेश कवटीकवार यांनी त्यांच्या पथकास सार्थक एन्टरप्रायजेसला गेल्या महिन्यात २९ रोजी भेट दिली होती. मात्र, पत्ता चुकीचा असल्याने त्यांना कार्यालय तेथे आढळले नाही. त्यांनी अधिक माहिती घेतली असता हे सार्थक एंटरप्रायझेसचे नवे कार्यालय पुण्यातील मंतरवाडी येथे हलविण्यात आल्याचे समजले. त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. या वेळी पेढीच्या मालकाने कार्यालयाची परवानगी न घेता तसेच अर्ज न करता जागा बदल केला असल्याने औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली. तसेच या पेढीच्या मंतरवाडी नवीन जागेतून औषधाचा साठा नमुना १६ अंतर्गत १ नमुना चाचणीसाठी काढून जप्त करण्यात आला. जप्त केलेली औषधाची किंमत एकूण १३ लाख १२ हजार १२४ रुपये एवढी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट

याबाबत मालक व रजिस्ट्रर्ड फार्मासिस्ट कोल्हे यांना विचारले असता त्यांना एकूण १७ इंजेक्शन मे. ह्यूमन रिसोर्सेस पनवेल यांच्याकडून मिळाले होते. त्यातील त्यांनी ९ इंजेक्शनची विक्री करून उर्वरित ८ इंजेक्शन परत ह्यूमन रिसोर्सेस यांना पाठविण्यात आले होते. त्याबाबतची खरेदी व विक्री बिले कोल्हे यांनी आजपर्यंत कार्यालयात सादर केली नाहीत. हे औषध त्यांनी रुग्णाला विक्रीच केली नाही असे सांगितले. हा औषधसाठा त्यांच्याकडे कसा आला याबाबत त्यांना कार्यालयाच्या पत्राद्वारे (५ जुलै) नोटीस बजावण्यात आली. त्याबाबत त्यांचे लेखी स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोल्हे यांनी आजपर्यंत सदर नोटिशीबाबत त्यांचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

चौकट

मोशी (ता. हवेली) येथील साईनाथ हॉस्पिटलला औषध निरीक्षक महेश कवटीकवार यांनी त्यांच्या दुकानाला भेट दिली. या वेळी व्यवस्थापक डॉ. संदेश कुमार जकाते यांनी व्यंकट रेड्डी नागारेड्डी या रुग्णाला हे इंजेक्शन दिल्याचे सांगितले. त्यांनी ६ इंजेक्शन बाहेरून आणले होते व उर्वरित रुग्णालयाच्या औषधालयातून घेतले होते. या रुग्णाचे नातेवाईक अनिल रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते सार्थक एन्टरप्रायजेसचे गणेश कोल्हे यांच्याकडून हे इंजेक्शन घेतल्याचा लेखी जबाब दिला आहे. परंतु औषध हे कोठून खरेदी केले व कोणाकोणाला विकले याबाबत खुलासा दिला नाही. तसेच खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली. हे बनावट औषध रुग्णाला विकून त्यांचीही फसवणूक केलेली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sale of counterfeit medicine for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.