वेल्हेत खतांची नव्या दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:42+5:302021-05-25T04:10:42+5:30
तालुक्यामध्ये खतांचे पाच विक्रेते आहेत. खरिपाचे क्षेत्र पाच हजार हेक्टरवर असून, याठिकाणी मुख्य पीक म्हणून भात केला जातो. ...
तालुक्यामध्ये खतांचे पाच विक्रेते आहेत. खरिपाचे क्षेत्र पाच हजार हेक्टरवर असून, याठिकाणी मुख्य पीक म्हणून भात केला जातो. तांदळाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. १८ गाव मावळ, पासली, केळद, जाधवाडी, निगडे, कुंबळे, वरोती, वाजेघर, भुतोंडे, दादवडी, मेरवणे, वांगणी, सोंडे, कारला सोंडे, माथना कोडवडी परिसरात सध्या भात रोपे बनवण्याची कामे चालू आहेत, त्यामुळे खतांची मागणी वाढली आहे. परंतु नवीन दर प्रमाणे खतांची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत आहे
शेताला खत घेण्यासाठी गेले असता नवीन दराने खताची विक्री होत आहे, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे जुन्या दराने खत विक्री होणे आवश्यक आहे, तरीदेखील नवीन दराने खताची विक्री होत असल्याने आमची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे विंझर येथील शेतकरी संतोष लिम्हण यांनी सांगितले.
सम्राटच्या एकूण १०० पिशव्या एक हजार ९०० रुपये दराने विक्रीसाठी घेतल्या असून, जुन्या दराप्रमाणे विकल्यास एक पिशवी बाराशे रुपयाला विकावी लागेल एका पिशवी मागे सातशे रुपये तूट कोण भरून काढणार, शासनाने अनुदान दिल्यास तूट भरून निघेल असे वेल्हेतील खत विक्री करणारे आनंद देशमाने यांनी सांगितले.
२४ मार्गासनी
वेल्हे (ता.वेल्हे) खत खरेदी करण्यासाठी दुकानासमोर लागलेली रांग.