राज्यात कापूस बियाणे १ जूनपासून विक्रीला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:25 AM2019-05-14T01:25:20+5:302019-05-14T01:25:35+5:30
राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या दृष्टीने कापसाच्या बियाण्याचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांसाठी २ कोटी २० लाख कापसाच्या बियाण्यांची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
पुणे : राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या दृष्टीने कापसाच्या बियाण्याचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांसाठी २ कोटी २० लाख कापसाच्या बियाण्यांची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या १५ मेपर्यंत सर्व जिल्ह्यात बियाणे मिळतील. त्यानंतर सर्व अधिकृत कृषी केंद्रांवरून येत्या १ जूनपासून विक्रीला सुरूवात होईल, असे कृषी आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४२ हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कृषी विभागाक डून गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. प्रतिबंधित करण्यात आलेले एसटीबीटी बियाणे बाजारात विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
मागील वर्षी राज्यातील विविध भागात बनावट बियाण्यांची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाने ३० गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे एसटीबीटी बियाण्याच्या विक्रीला लगाम बसल्याचेही सांगण्यात आले.