मुंबईतून रिक्षा चोरून पुण्यात होतेय विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:49 AM2018-08-26T02:49:41+5:302018-08-26T02:50:01+5:30
नऊ रिक्षा हस्तगत : सव्वादोन लाखांचा मुद्देमाल
पुणे : मुंबईतील ठाणे व भिवंडी येथून रिक्षा चोरून त्यांची नंबर प्लेट बदलून पुण्यात विक्री करणाऱ्या सराइताला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोंढवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या ९ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आकाश मोहन लोखंडे (वय २६, रा. आमिर चिकन सेंटरजवळ, महम्मदवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जप्त तीन रिक्षा या मुंबईतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस हवालदार शरद नवले आणि पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना आकाश लोखंडे याची माहिती तपासी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आमिर चिकन सेंटर जवळून लोखंडे याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. परिमंडळ पाचचे अपर पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षख नितीन बोधे, पोलीस हवालदार शरद नवले, ईकबाल शेख, संजीव कळंबे, जगदिश पाटील, दिपक क्षीरसागर, आदर्श चव्हाण, प्रशांत कांबळे आणि उमेश शेलार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.