सलीम शेख, संदीप शिंदे प्रथम
By admin | Published: December 10, 2014 11:16 PM2014-12-10T23:16:14+5:302014-12-10T23:16:14+5:30
प्राथमिक गटात श्री वाघेश्वरी विद्यालयाचा सलीम शेख, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात वाणोवाडीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या संदीप शिंदे यांने प्रथम क्र मांक पटकाविला.
Next
बारामती : वाघाळवाडी (ता.बारामती) येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 4क् व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात श्री वाघेश्वरी विद्यालयाचा सलीम शेख, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात वाणोवाडीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या संदीप शिंदे यांने प्रथम क्र मांक पटकाविला. या वेळी 152 प्रकल्प सादर करण्यात आले.
बारामती पंचायत समिती शिक्षण विभाग, सह्याद्री पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने वाघाळवाडी येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 1ली ते 8वीच्या गटात प्राथमिक गटात श्री वाघेश्वरी विद्यालयाचा सलीम शेख याच्या ‘सोलर धान्य संरक्षक यंत्र’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला, तर बारामती येथील आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलच्या निसर्गा वसंत दराडे हिच्या ‘पाण्याचा पुनर्वापर’ प्रकल्पाला द्वितीय, तर तृतीय क्रमांक उत्कर्ष प्राथमिक आश्रम शाळेच्या मुस्कान जावेद मोकाशीच्या ‘कच:याचे नियोजन’ प्रकल्पाला मिळाला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात वाणोवाडीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या संदीप शिंदे याने सादर केलेल्या ‘स्वयंचलित पथदिवे नियंत्रक’ प्रकल्पाला, तर विद्या प्रतिष्ठानच्या पियुष शावरेच्या ‘शॉकअॅब्सोबर’ या प्रकल्पाला द्वितीय, तर गोजुबावीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या सागर अनंता पिसेच्या ‘सौर ऊज्रेवर चालणारे कापणी यंत्र’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.
बी. के.मोटे यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर. कोरे यांनी आभार मानले. या वेळी पंचायत समितीच्या सभापती करण खलाटे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके, गटविकास अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते.
बारामती : कळंब (ता.इंदापूर) येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 259 प्रकल्प सादर करण्यात आले होते. तालुक्यातील 78 शाळेतील 3क्क् विद्याथ्र्यानी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. मोठय़ा गटात नारायणदास रामदास हायस्कूलचा अमन सय्यद, तर प्राथमिक गटात नंदिकेश्वर विद्यालयाचा प्रथमेश सोळसे यांनी प्रथम क्र मांक पटकाविला.
इंदापूर पंचायत समिती शिक्षणविभाग, ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने येथील वालचंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 1ली ते 8वी च्या गटात नंदिकेश्वर विद्यालयाचा प्रथमेश सोळसे याच्या ‘विज्ञान व गणितातील युगांतरी घटना’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. शेटफळ हवेली येथील माध्यमिक विद्यालयातील प्राजक्ता साळुंकेच्या सौरऊज्रेवरील कांडप यंत्रला द्वितीय, तर तृतीय क्रमांक नारायणदास रामदास हायस्कूलच्या शाहिस्ता शेखच्या ‘लाइव्ह कॅमेरा’ प्रकल्पाला मिळाले.
मोठय़ा गटात नारायणदास रामदास हायस्कूलच्या सय्यदने सादर केलेल्या ‘कचरा व्यवस्थापन’ प्रकल्पाला, तर भारत चिल्ड्रेन अॅकेडमीच्या स्वप्निल मानेच्या ‘सोलर रॅपिड कुकर’ या प्रकल्पाला द्वितीय, तर प्रगती विद्यालयातील अथर्व जाधव यांच्या ‘प्लॅस्टिकपासून टिकाऊ रस्ता’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.
पंचायत समितीच्या सभापती डॉ. सोनाली ननवरे, उपसभापती नारायण वीर, दत्तात्रय फडतरे, रामचंद्र कदम, गटशिक्षणाधिकारी प्रदीप गुरव, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे, सरपंच ज्ञानेश्वर खंडागळे, सदस्य सुहास डोंबाळे, प्राचार्य सुधीर डोंबाळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.