सखींच्या कर्तृत्वाला सलाम
By admin | Published: November 18, 2016 04:43 AM2016-11-18T04:43:31+5:302016-11-18T04:43:31+5:30
आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सखी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
पुणे : आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सखी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
सेवाव्रतींच्या कार्यातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि सशक्तीकरण, सबलीकरणाचा मार्ग खुला करण्यासाठी पुरस्कारार्थींना ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, शांताराम जाधव ट्रस्टचे संस्थापक शांताराम जाधव, ढोले पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या उपाध्यक्षा उमा ढोले-पाटील, छाजेड असोसिएटसच्या सपना छाजेड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नुकताच हयात रिजेन्सी येथे हा शानदार पुरस्कार सोहळा रंगला. यावेळी रेंज रोव्हरचे मार्केटिंग मॅनेजर विवेक वराळे हेही उपस्थित होते.
सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत आणि ‘लोकमत’तर्फे आयोजित सखी सन्मान पुरस्कार सोहळयात कला-साहित्य, आरोग्य, उद्योग, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आदि क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणा-या महिलांचा गौरव करण्यात आला. नीता पारख (औद्योगिक), नन्सी कट्याल (शैक्षणिक), रुपा खन्ना (सामाजिक), मंजुषा पाटील (सांस्कृतिक), सोनाली तोडकर (क्रीडा), डॉ. पद्मा अय्यर (आरोग्य) आदि सखींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
पिनल वानखेडे यांना लोकमत व्हर्च्युआॅसिटी पुरस्कार, प्रीती मोदी यांना लोकमत व्हिजन पुरस्कार, नेहा कांदळगावकर यांना लोकमत
कॅलिबर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी सह प्रायोजक होते. अनिल काटे इंटरप्राईजेस सह प्रायोजक होते.