पानिपत शौर्यदिनी वीरांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:37+5:302021-01-16T04:13:37+5:30
पुणे : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात पानिपतच्या युद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धानंतर कोणत्याही परकीय शक्तींनी खैबर खिंडीतून भारतात घुसण्याची ...
पुणे : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात पानिपतच्या युद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धानंतर कोणत्याही परकीय शक्तींनी खैबर खिंडीतून भारतात घुसण्याची हिंमत केली नाही. पानिपत घडले नसते तर इतिहास वेगळा असता असे म्हटले जाते. आपल्या पूर्वजांना ज्या भूमीत वीरगती प्राप्त झाली, त्या रणांगणातील माती असलेल्या कलशाचे पूजन करून ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमने पानिपतच्या रणसंग्रामात हुतात्मा झालेल्या वीरांना मानवंदना दिली.
या प्रसंगी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, चित्रपटाचे निर्माते शेखर मोहिते पाटील, सौजन्य सूर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा, यांच्यासह संदीप मोहिते पाटील, गणेश सातपुते, तळबीडचे सरपंच नाना मोहिते पाटील उपस्थित होते. या प्रसंगी चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, जयेश संघवी, विनोद सातव यांनी वीरांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अभ्यासक सौरभ कर्डे यांनी, तर सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले.