जिद्दीला सलाम! साठीतल्या तरुणांनी काश्मीर मधले तब्बल १३ हजार फुटांचे ‘गडसर पास’ शिखर केले सर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 02:46 PM2024-09-23T14:46:23+5:302024-09-23T14:46:41+5:30

हवामान, पाऊस, बर्फ आणि उंचीवर असणारा ऑक्सिजनचा त्रास यांचा सामना करत ६० वर्षांच्या तरुणांनी शिखर गाठले

Salute to stubbornness! Sixteen youths summited the 13,000-feet 'Gadsar Pass' in Kashmir, sir | जिद्दीला सलाम! साठीतल्या तरुणांनी काश्मीर मधले तब्बल १३ हजार फुटांचे ‘गडसर पास’ शिखर केले सर

जिद्दीला सलाम! साठीतल्या तरुणांनी काश्मीर मधले तब्बल १३ हजार फुटांचे ‘गडसर पास’ शिखर केले सर

गराडे : ‘काश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक’ अतिशय अवघड समजला जाणारा ‘गडसर पास’ शिखर १३,७५० फूट उंची असलेला आणि तेथील हवामान, पाऊस, बर्फ आणि उंचीवर असणारा ऑक्सिजनचा त्रास. यांचा सामना करत पुणे होमगार्ड माजी जिल्हा समादेशक प्रा. दीपक महादेव जांभळे (वय ६१) आणि इंदापूर येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. लहू श्रीपती कदम (वय ६४) यांनी ४२०० मीटर (१३,७५० फूट) उंचीचे गडसर पास हे शिखर सर केले आहे.

काश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक हा ७५ किमीचा ट्रेक सहा दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण केला. सोनमार्ग ते निचनाई ११ किमी नीचनाई ते विशनसर लेख १३ किलोमीटर, विशनसर लेक ते गडसर लेक १६ किमी गडसर लेक ते सतसर लेक ब १२ किमी, सतसर लेक ते गंगबल ट्विंन लेक १० किमी गंगबल ट्विंंन लेक ते नारंग १३ किमी, असा ७५ किमीचा ‘काश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक’ नुकताच या दोन अवलियांनी सर केला. द सर्चिंग सोल या काश्मीरमधील समूहाबरोबर भारतातील आणि भारताबाहेरील सिंगापूर, व्हिएतनाम, रशिया या देशांतील असे ५० ट्रेकर्स होते. सोनमर्गपासून निचनाई मार्गे पाऊस, हवामानाचा आणि ऑक्सिजनचा अंदाज घेत तिसऱ्या दिवशी १३,७५० फूट उंचीवरील गडसर पास हे शिखर सर केले. यापूर्वी डॉ. लहू कदम यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प एप्रिलमध्येच केला होता. त्याबरोबर महाराष्ट्रातील राजगड, हरिश्चंद्रगड, कळसुबाई ही शिखरे यशस्वी सर केली आहेत. डॉ. लहू कदम हे इंदापूर येथील नामांकित बालरोग तज्ज्ञ असून, आजही वयाच्या ६४ व्या वर्षी ते गाडीचा कमी वापर करतात. हॉस्पिटल आणि इंदापूर शहरात जास्तीत जास्त सायकलचा वापर करतात.

आतापर्यंत २५००० किमी सायकलिंग 

डॉ. कदम सांगतात असे ट्रेक करणे म्हणजे हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य अधिक कार्यक्षम करणे. प्रा. दीपक जांभळे हे आजही वयाच्या ६१ व्या वर्षी पुरंदर ते वाघा बॉर्डर, पुरंदर ते कन्याकुमारी, हम्पी आणि महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर सायकलिंग करून जात असतात. आतापर्यंत २५००० किमी त्यांनी सायकलिंग केले आहे. त्यांनीही गडवाल ट्रेक, शिलॉंग ट्रेक, कळसुबाई शिखर असे महाराष्ट्रातील जवळपास सर्व किल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. दोघांनाही ट्रेकिंग, सायकलिंगची आवड असल्यामुळे हे महाराष्ट्रातील गड किल्ले, ट्रेकिंग करण्यास आणि सायकलिंग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title: Salute to stubbornness! Sixteen youths summited the 13,000-feet 'Gadsar Pass' in Kashmir, sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.