समाविष्ट गावांचा एकत्र आराखडा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:53 AM2017-07-30T03:53:09+5:302017-07-30T03:53:09+5:30
महापालिकेत समाविष्ट होणाºया ३४ गावांचा एकत्रित विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी या गावांच्या समावेशासाठी प्रयत्नशील असणाºया हवेली
पुणे : महापालिकेत समाविष्ट होणाºया ३४ गावांचा एकत्रित विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी या गावांच्या समावेशासाठी प्रयत्नशील असणाºया हवेली तालुका कृती समितीने केली आहे. सर्व प्रमुख सरकारी अधिकाºयांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी म्हणून ही बाब आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
गावांचा महापालिकेत समावेश करण्याबाबत राज्य सरकारने नुकतेच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. याबाबत बोलताना समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी सांगितले की, ही गावे पुढील काही वर्षांत टप्प्याटप्याने महापालिका हद्दीत घेण्यात येणार आहेत. नियोजन नसल्याने या सर्वच गावांमध्ये इमारती; तसेच रस्त्यांची असुविधा आहे. आता नियोजनबद्ध विकास करायचा असेल, तर त्यासाठी सर्व गावांचा एकत्रित विकास आराखडा करायला हवा. पोपटराव खेडेकर, संदीप तुपे, सचिन हगवणे, संतोष ताटे, बंडुशेठ खांदवे, सुभाष नाणेकर, मिलिंद पोकळे, संदीप चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार व पीएमआरडीएचे किरण गित्ते यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.