महानाट्यातून समरसता

By admin | Published: January 25, 2016 01:01 AM2016-01-25T01:01:33+5:302016-01-25T01:01:33+5:30

आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा जोतिबा फुले

Samarassata from Mahanatya | महानाट्यातून समरसता

महानाट्यातून समरसता

Next

पुणे : आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून देणारे, ऐतिहासिक प्रसंगाची हृदयस्पर्शी गुंफण समरसता या भव्य नाट्यातून साकारण्यात आली.
निमित्त होते स्व-रूपवर्धिनी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मकर संक्रमण उत्सवाचे. सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यात ५० झोपडपट्ट्या आणि वस्तीमधील ६०० बाल युवा कलाकार सहभागी झाले होते.
‘बंधुत्वाचे घडवू दर्शन, समता आणू समरसतेतून’ या विषयावर या महानाट्याचे आयोजन शनिवारवाडा प्रांगण येथे रविवारी करण्यात आले. या वेळी पदम मांडगावकर पुरस्कार माध्यमिक गट, उच्च माध्यमिक गट, पदवीधर या स्वरूपवर्धिनीच्या शाखेत शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना देण्यात आला.
महानाट्यात भारतीय समाजात असलेले गुण आणि दोषांचे दर्शन घडविण्यात आले. पोवाड्यांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. संतांनी जाती-पातीला विरोध करून समरसतेची क्रांती कशी घडवून आणली, हे या नाट्याचे वैशिष्ट्य ठरले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती, दहशतवादाविरोधात विशेष कामगिरी करणारे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे सहकार्याध्यक्ष रामभाऊ किंबळे, संस्थेचे उपाध्यक्ष उदय गुजर, सहकार्यवाह पुष्पा नडे, उत्सवप्रमुख वैदेही बेहेरे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Samarassata from Mahanatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.