समर्थ अभियांत्रिकी व इस्त्रोचे चर्चासत्र यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:09 AM2021-04-27T04:09:50+5:302021-04-27T04:09:50+5:30
या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजेच लाईव्ह अँड इंटेरॅक्टिव्ह मोड आणि ई-लर्निंग मोड या दोन वितरण प्रणाली विकसित केल्या ...
या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजेच लाईव्ह अँड इंटेरॅक्टिव्ह मोड आणि ई-लर्निंग मोड या दोन वितरण प्रणाली विकसित केल्या आहेत. मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने अमृता ई-लर्निंग प्रयोगशाळेने विकसित केलेल्या इंटरनेट आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मद्वारे दूरस्थ शिक्षणाची थेट आणि संवादात्मक कार्यपद्धती सक्षम केले आहे.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी रिमोट सेन्सिंग आणि जिओ इन्फोर्मेशन सायन्स शिकण्याची संधी प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे. रिमोट सेंसिंग अँड जिओ इन्फॉर्मेशन सायन्सचा हा मूलभूत अभ्यासक्रम पदवी स्तरावर स्वतंत्र अभ्यास आणि प्रकल्प अनुभवासह आर एस आणि जीआयएस तंत्रज्ञानामध्ये त्यांचे ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य तयार करण्यास संधी प्राप्त करून देतो. अभियांत्रिकीतील निरनिराळ्या विषयांवर संशोधनात्मक चर्चासत्र व सादरीकरण घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयाने हाऊ टू रीच प्रोग्राम समन्वयक म्हणून प्रा. निर्मल कोठारी यांची नेमणूक केलेली आहे, अशी माहिती प्राचार्य पाटील यांनी दिली.