संभाजी भिडेंचे धारकरी संचेती चौकात दाखल; मात्र पालखीत सहभागी होणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:36 PM2022-06-22T17:36:36+5:302022-06-22T17:36:46+5:30
संभाजी भिडे गुरुजींची संघटना असलेल्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे हजारो धारकरी शिवजीनागरच्या संचेती चौकात दाखल झाले आहेत
पुणे : संभाजी भिडे गुरुजींची संघटना असलेल्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे हजारो धारकरी शिवजीनागरच्या संचेती चौकात दाखल झाले आहेत. या ठिकाणी सर्व धारकरी बसले आहेत. चौकात ते दोन्ही पालख्यांचे दर्शन घेणार असून पालखीमध्ये सहभागी होणार नाही असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी हजारो धारकरी पालखीमध्ये सहभागी सहभागी होत असतात. काही वर्षांपूर्वी तर डेक्कन परिसरात तलवारी हातात घेऊन हे धारकरी पालखीत सहभागी झाले होते. त्यामुळे, वादंग निर्माण झाला होता. तेव्हापासून धारकऱ्यांना शस्त्र घेऊन पालखीत सहभागी होण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. तेव्हापासून धारकरी संचेती चौकात जमून ते दर्शन घेत असतात.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे पालखी आली नव्हती. यावर्षी पालखी येणार असून संचेती चौकात एका बाजूला हे धारकरी जमले आहेत. याबाबत शिवप्रतिष्ठानचे सेनापती अशोक वीरकर म्हणाले की, आम्ही दोन्ही पालख्यांचे याच ठिकाणी राहून दर्शन घेणार आहोत. तसेच संत ज्ञानेश्वरांची पालखी गेल्यावर संभाजी पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहोत. यामध्ये काही महिला धारकरी देखील आहेत. शिवप्रतिष्ठानचे संजय पासलकर म्हणाले की, आमचा कायदा सुव्यस्थेला अडचण निर्माण करन्याचा हेतू नाही. मात्र संघटनेबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे.