पुण्यातील संभाजी पुल रात्रीच्या वेळी राहणार बंद; वाहतूक विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:41 PM2021-08-23T19:41:41+5:302021-08-23T19:44:42+5:30

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Sambhaji Bridge in Pune will be closed at night; Decision of the Department of Transportation | पुण्यातील संभाजी पुल रात्रीच्या वेळी राहणार बंद; वाहतूक विभागाचा निर्णय

पुण्यातील संभाजी पुल रात्रीच्या वेळी राहणार बंद; वाहतूक विभागाचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देमेट्रोच्या कामासाठी २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुल बंद

पुणे : वनाज ते जिल्हा न्यायालयादरम्यान मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान पुलावरील सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

खंडोजीबाबा चौकातून टिळक रोडकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग

खंडोजीबाबा चौक, कर्वे रोडने शेलारमामा चौक, यशवंतराव चव्हाण चौक, रसशाळा चौक, एस एम जोशी पुल, गांजवे चौक, डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडे वळून शास्त्री रोडने दांडेकर पुलमार्गे इच्छित स्थळी जावे.

टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग

टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरीवाडा, रमणबाग शाळा चौक, डावीकडे वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक, बालगंधर्व पुलावरुन डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडुजीबाबा चौक. तसेच केळकर रोडवरुन नदीपात्रातील रोडने ओंकारेश्वर मंदिरमार्गेही वाहनचालक जाऊ शकतात. यशवंतराव चव्हाण पुलावरुन फक्त दुचाकी वाहने ये जा करुन शकतात.

Web Title: Sambhaji Bridge in Pune will be closed at night; Decision of the Department of Transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.