संभाजी पुल २० दिवस रात्रीच्या वेळी राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:56+5:302021-08-24T04:14:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वनाज ते जिल्हा न्यायालयादरम्यान मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) पिलरवर गर्डर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वनाज ते जिल्हा न्यायालयादरम्यान मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान पुलावरील सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
खंडोजीबाबा चौकातून टिळक रोडकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग
खंडोजीबाबा चौक, कर्वे रोडने शेलारमामा चौक, यशवंतराव चव्हाण चौक, रसशाळा चौक, एस एम जोशी पुल, गांजवे चौक, डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडे वळून शास्त्री रोडने दांडेकर पुलमार्गे इच्छित स्थळी जावे.
टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग
टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरीवाडा, रमणबाग शाळा चौक, डावीकडे वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक, बालगंर्धव पुलावरुन डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडुजीबाबा चौक. तसेच केळकर रोडवरुन नदीपात्रातील रोडने ओमकारेश्वर मंदिरमार्गेही वाहनचालक जाऊ शकतात.
यशवंतराव चव्हाण पुलावरुन फक्त दुचाकी वाहने ये जा करुन शकतात.