हिंदु जनजागृती समितीनंतर अाता संभाजी ब्रिगेडचा सनबर्न फेस्टिवलला विराेध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 08:08 PM2018-12-11T20:08:25+5:302018-12-11T20:10:42+5:30

पुण्यात हाेणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला संभाजी ब्रिगेडकडून विराेध करण्यात अाला असून प्रशासनाने या फेस्टिवलला परवानगी नाकारावी अशी मागणी देखील करण्यात अाली अाहे.

sambhaji brigade opposed sunburn festival after hindu janjagruti samiti | हिंदु जनजागृती समितीनंतर अाता संभाजी ब्रिगेडचा सनबर्न फेस्टिवलला विराेध

हिंदु जनजागृती समितीनंतर अाता संभाजी ब्रिगेडचा सनबर्न फेस्टिवलला विराेध

Next

पुणे : गाेव्यातून पुण्यात अालेल्या सनबर्न फेस्टिवलला अाता संभाजी ब्रिगेडने देखील अापला विराेध दर्शवला अाहे. दाेन वर्षापासून पुण्यात हाेत असलेल्या या फेस्टिवलला हिंदू जनजागृती समिती विराेध करत अाली अाहे. अाता सनबर्न फेस्टिवल हा दारुड्या संस्कृतीचा व अमली पदार्थांचा खउला बाजार अाहे असे म्हणत संभाजी ब्रिगेडकडून विराेध करण्यात अाला अाहे. 

    गेल्या अनेक वर्षांपासून डिसेंबरमध्ये गाेव्यात हाेणारा सनबर्न फेस्टिवल गेल्या दाेन वर्षांपासून पुण्यात हाेत अाहे. पुण्यात हा फेस्टिवल सुरु झाल्यापासून वादात सापडला अाहे. पुण्यात पहिल्या वर्षी हा फेस्टिवल केसनंद येथे झाला हाेता. त्यावेळी टेकडी फाेडून रस्ता तयार केल्याचा अाराेप करण्यात अाला हाेता. दुसऱ्यावर्षी हा फेस्टिवल पिंपरी चिंचवड येथे भरविण्यात अाला हाेता. सनबर्न फेस्टिवल हा पाश्चिमात्य संस्कृतीचे समर्थन करणारा तसेच या फेस्टिवलमध्ये अमली पदार्थांचे सेवण केले जाते असा अाराेप या अाधी हिंदु जनजागती समितीकडून गेली दाेन वर्ष करण्यात आला अाहे. अाता संभाजी ब्रिगेडने सुद्धा या फेस्टिवलला विराेध दर्शवला अाहे. सनबर्न फेस्टिवल हा दारुड्या संस्कृतीचा व अमली पदार्थांचा खुला बाजार अाहे. हा सरकार पुरस्कृत अश्लिल पाश्चात्य संस्कृतीचा नंगानाच अशी टीका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत अाहे.  

    तसेच सनबर्न फेस्टिव्हल ला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वा. बंद केले जातात. सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हल मध्ये रात्रभर अमली पदार्थाचे प्रचंड सेवन व वापर होत असतो. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. समता, समानता व बंधूता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे जिजाऊ - शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे - जवळकरांचे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे हब असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही असे ब्रिगेडकडून ठणकावून सांगण्यात अाले अाहे. तसेच प्रशासनाने या फेस्टिवलला परवानगी नाकारावी अशी मागणी देखील करण्यात अाली अाहे. 

Web Title: sambhaji brigade opposed sunburn festival after hindu janjagruti samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.