दावडीच्या सरपंचपदी संभाजी घारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:35+5:302021-02-26T04:12:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील मोठे गाव आहे. या ग्रामपंचायतवर १३ सदस्य आहे. सरपंचपद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील मोठे गाव आहे. या ग्रामपंचायतवर १३ सदस्य आहे. सरपंचपद हे सर्वसाधारण आहे. सरपंचपदासाठी संभाजी घारे यांचा एकमेव अर्ज, तर उपसरपंच पदासाठी राहुल कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांच्याही बिनविरोध निवडी झाल्या.
या वेळी या निवडणुकीच्या सभेत सर्वपक्षीय श्रीमहालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे फक्त आठच सदस्य हजर होते. त्यामुळे सरपंच संभाजी घारे, तर उपसरपंच राहुल कदम यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी सीताराम तुरे यांनी काम पाहिले. त्यांना कामगार तलाठी शेळके, ग्रामविकास अधिकारी तान्हाजी इसवे व पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांनी सहकार्य केले. या वेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असणार आहे, असे सांगितले. या वेळी नवनिर्वाचित सदस्या राणीताई डुंबरे, माधुरी खेसे, पुष्पा होरे, धनश्री कान्हुरकर, अनिल नेटके, संतोष सातपुते हजर होते. पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, राष्ट्रवादीचे युवानेते मयूर मोहिते, शिवसेनेचे युवानेते विजयसिंह शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे प्रमुख सचिन नवले, सुरेश डुंबरे, भाऊसाहेब होरे, मारूत्ती बोत्रे यांनी हा पॅनेल गावचा विकास करून आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करणार असलेचे सांगितले.
- नवनिर्वाचित सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम व सदस्यांचा यांचा सन्मान करताना ग्रामस्थ.