संभाजी महाराज जयंती साजरी
By admin | Published: May 16, 2014 04:43 AM2014-05-16T04:43:24+5:302014-05-16T04:43:24+5:30
पूजा, अभिषेक, मानवंदना, छत्रपती शंभूप्रेरणा ज्योत, व्याख्याने आणि शाहिरी संगीत कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी छत्रपती संभाजीमहाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
लोणी कंद : पूजा, अभिषेक, मानवंदना, छत्रपती शंभूप्रेरणा ज्योत, व्याख्याने आणि शाहिरी संगीत कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी छत्रपती संभाजीमहाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात झाला. श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे संभाजीराजांची बलिदानभूमी आहे. सकाळपासून ही भूमी शंभूभक्तांनी गजबजून गेली होती. प्रारंभी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप अप्पा भोंडवे यांच्या हस्ते पूजा व अभिषेक झाला. या वेळी सरपंच जयश्री शिवले, उपसरपंच गणेश पुजारी, संतोष शिवले, हनुमंत शिवले, शिवव्याख्याते गणेश फरताळे, पंडित शिवले, संजय शिवले, ज्ञानेश्वर शिवले, अण्णासाहेब चव्हाण, गजानन शिवले मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी समस्त ग्रामस्थ वढू बुद्रूक यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग आरगडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी प्रेरणाज्योत संदीप भोंडवे यांच्या हस्ते प्रज्ववित करून ५० कार्यकर्त्यांनी दौडत नेली. शंभूप्रेमी मंडळ सातारा, छत्रपती संभाजी मंडळ नाशिक यांनी ही ज्योत प्रज्वलित करून नेल्या. या वेळी तरुणाईचा उत्साह होता. छाया संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जयंती सोहळा आयोजित केला होता. प्रदेशाध्यक्ष दयानंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विष्णूजी नागणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरचे उपनगराध्यक्षा ललिता शिंदे यांनी आपल्या सहकार्यांसह येऊन मानवंदना दिली. विजय काळे यांचा शाहिरी कार्यक्रम झाला. शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख दत्ता आबा गायकवाड व शंभूभक्त सुभाष गायकवाड यांनी स्वतंत्रपणे मानवंदना दिली. शंभुराजे चॅरिटेबल ट्रस्ट, छावा संघटना, पुणे, झुंजार ग्रुप, गड किल्ले संघटना, उत्कर्ष मराठा संघ आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संतोष शिवले यांनी आभार मानले.(वार्ताहर)