डोंगरगावात एकाच रोहित्रावरील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:18 AM2021-02-28T04:18:25+5:302021-02-28T04:18:25+5:30
सर्व शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त पुणे : डोंगरगाव (ता. हवेली) येथील एकाच रोहित्रावरील १३ शेतकऱ्यांनी कृषिपंप धोरण २०२० अंतर्गत ...
सर्व शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त
पुणे : डोंगरगाव (ता. हवेली) येथील एकाच रोहित्रावरील १३ शेतकऱ्यांनी कृषिपंप धोरण २०२० अंतर्गत सुधारित मूळ थकबाकीपैकी २ लाख ८३ हजार रुपये या ५० टक्के रकमेचा भरणा करीत वीजबिल कोरे केले आहे. त्यांना महावितरणकडून तातडीने नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतर तीन शेतकऱ्यांनी देखील १ लाख ६० हजार रुपयांचा भरणा करून वीजबिलांची थकबाकीमुक्ती मिळविली आहे.
याबाबत माहिती अशी की, हडपसर ग्रामीण उपविभाग अंतर्गत डोंगरगाव येथील कामठेवस्ती, शिंदेवस्ती येथील रोहित्र नादुरुस्त झाले होते. या रोहित्रावर १३ शेतकऱ्यांना कृषिपंपाची वीजजोडणी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे एकूण ६ लाख ८८ हजार रुपयांची वीजबिल थकीत होते. पेरणे येथील महावितरणचे शाखा अभियंता अंकुश मोरे, जनमित्र राहुल लेंडे यांनी डोंगरगाव येथे जाऊन गावातील शेतकऱ्यांना कृषिपंप धोरण २०२० मधील थकबाकीमुक्तीची माहिती दिली.