फुलझाडांना मरण्यापासून वाचवणारे सामीष फुलपाखरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:52+5:302021-09-02T04:20:52+5:30
श्रीकिशन काळे पुणे : सामीष म्हणजे एपफ्लाय (aplfly) फुलपाखरू हे चक्क फूलझाडांना वाचविण्याचे काम करते. या फूल ...
श्रीकिशन काळे
पुणे : सामीष म्हणजे एपफ्लाय (aplfly) फुलपाखरू हे चक्क फूलझाडांना वाचविण्याचे काम करते. या फूल झाडांवर पांढरी बुरशी येते आणि ती त्या फुलाझाडांना खाऊन टाकते. पण सामीष या फुलपाखरांची मादी या बुरशीच्या शेजारी अंडी घालते आणि बुरशीवर अळी राहून त्यांना खाते. त्यामुळे फुलझाड मरण्यापासून वाचते. म्हणून फुलपाखरांचे महत्त्व खूप आहे.
भारतात सुमारे १५०० फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. त्यात पश्चिम घाटात तर अधिक फुलपाखरं दिसून येतात. या फुलपाखरू सप्टेंबर महिन्याची सुरुवात आजपासून होत आहे. त्यानिमित्त या अनोख्या फुलपाखरांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न फुलपाखरू अभ्यासक रजत जोशी यांच्याशी संवाद साधून घेतला आहे.
रजत म्हणाला, ‘एपफ्लाय - सामिष हे फुलपाखरू नील कुळातील असून त्याचा आकार २-३ सीएम इतका आहे. या फुलपाखराचा जीवन प्रवास विलक्षण असतो. या फुलपाखराची मादी ही चक्क पांढऱ्या बुरशीच्या जवळ अंडी घालते. पांढरी बुरशी अर्थात मिली बग आणि इतर स्केल इन्सेक्ट असे किडे असतात. हे उपद्रवी किडे खूप फूलझाडांसाठी कीड असते. यांची संख्या अल्प काळात वाढते. हे किडे झाडावरचा रस शोषून त्याच्या अवयवांना काहीसे हनी ड्यू (honeydew) हा पदार्थ सोडून निकामी करतात आणि जर हे पसरत गेलं तर झाडांचा मृत्यू होऊ शकतो. त्यांच्या शरीराचं कातडं हे जाड असल्यामुळे कोणतेही कीटकनाशक त्यावर उत्तमरित्या काम करू शकत नाही. अशा वेळी ही कीड नैसर्गिकरित्या संपवते ती सामिष या फुलपाखराची अळी. ही अळी किड्यासारखीच दिसून त्यांच्यात राहते आणि त्यांना हळूहळू खाऊन झाडावरून संपवून टाकते जेणेकरून झाड जिवंत राहते आणि अळीला खाद्य मिळतं. ही अळी साधारण १०-१५ दिवस खाऊन नंतर एक सुंदर असा कोश करते, जो एका माकडाच्या चेह-यासारखा दिसतो.
साधारण ८-१० दिवसांनी एक छोटंसं फुलपाखरू त्यामधून बाहेर पडतं.
----------------------------------------
वेडेवाकडे अन्य वेगाने उडणारे फुलपाखरू
एपफ्लाय फुलपाखरू बिनाशेपटीचे असते. या नील कुळातील फुलपाखरांना मागे शेपटी असते. पण हे फुलपाखरू अपवाद आहे. याचे पंख वरच्या बाजूला असतात. त्यावर पांढरा पट्टा असतो. हे वेगाने व वेडेवाकडे उडत जाते. याचे सुरवंट हे मांसभक्षी असतात.
-----------------------------------------
फोटो - बुरशी -१
बटरफ्लाय-१