दिव्यांगांसाठीच्या तीन टक्के निधीसाठी दिव्यांग उपोषणाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:05+5:302021-06-17T04:08:05+5:30
या प्रकारानंतर पिंपरी पेंढार ग्रामपंचायतीने २०११ पासून २०१६ पर्यंतचा दिव्यांगांचा निधी कुठे गेला, ही शोधशोध सुरू झाली आहे. ...
या प्रकारानंतर पिंपरी पेंढार ग्रामपंचायतीने २०११ पासून २०१६ पर्यंतचा दिव्यांगांचा निधी कुठे गेला, ही शोधशोध सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये या अगोदर अनेकवेळा लेखी मागणी करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. दिव्यांगांना ३ टक्के निधी रोजगारविषयक मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसायासाठी शासनाच्या जी.आर.प्रमाणे गाळे उपलब्ध करून देणे, आदी काम न करता अद्यापपर्यंत मनमानी करून गाळे वाटप केले गेले, अखर्चित निधी जिल्हा परिषदकडे वर्ग केला असल्याचे तोंडी सांगणे त्यानंतर लेखी माहितीत निधी जिल्हा परिषदकडे वर्ग केला नाही असे सांगने अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देणे त्यामुळे दिव्यांगांना आधार द्यायचे लांब, अन्याय करण्याचे धोरण अवलंबिले गेले. त्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याची भूमिका दिव्यांग बांधवांनी घेतली. मात्र, सरपंचांशी याप्रकरणी आश्वासन मिळाल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.
या वेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे विभागप्रमुख महेंद्र फापाळे, पिंपरी पेंढार संघटनेचे सर्व सदस्य यांनी सरपंच सुरेखाताई वेठेकर, उपसरपंच अमोल वंडेकर, ग्रामसेवक जंजाळ यांना निवेदन दिले.
--
फोटो क्रमांक : १६ पिंपरी पेंढारी दिव्यांग उपोषण
फोटो ओळी : पिंपरी पेंढारच्या सरपंचांना मागण्यांचे निवेदन देताना दिव्यांग बांधव.