शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी टीडीएफ आंदोलनाच्या पावित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:30+5:302021-08-20T04:14:30+5:30

केडगाव: महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच इतरही विविध घटकातील शिक्षकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...

In the sanctity of the TDF movement to solve the problems of teachers | शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी टीडीएफ आंदोलनाच्या पावित्र्यात

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी टीडीएफ आंदोलनाच्या पावित्र्यात

Next

केडगाव: महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच इतरही विविध घटकातील शिक्षकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी राज्यभर आंदोलन राबविणार असल्याचे सूतोवाच राज्य टीडीएफचे नवनियुक्त कार्याध्यक्ष मा. जी. के. थोरात यांनी पुणे येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक राज्य अध्यक्ष विजय बहाळकर, टीडीएफ चे नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, राज्य उपाध्यक्ष हणमंतराव भोसले, राज्य सचिव हिरालाल पगडाल, पुणे विभाग अध्यक्ष शिवाजीराव जमाले, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष सचिन दुर्गाडे, पुणे शहर टीडीएफ अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांची भेट घेऊन त्यांचा पाठपुरावा केला जाईल, असा ठराव करण्यात आला. तसेच शिक्षकांचे विविध शैक्षणिक समस्या व शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार यावर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच, संघटनात्मक बांधणीचे महत्व लक्षात घेऊन संघटना बळकट करण्यासाठी काही नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राज्य कार्याध्यक्ष पदी जी. के. थोरात, तसेच विश्वस्त म्हणून के. एस. ढोमसे, कोल्हापूरचे सुरेश खोत व जळगावचे (अमळनेर) संदीप घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुणे शहर टीडीएफचे सचिव संतोष थोरात, राज मुजावर, आरकडे, पडवळ, खामकर, दादासो पाटील, लांडे तसेच राज्यातील टीडीएफचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी केले. सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. तर आभार के. एस. ढोमसे यांनी मानले.

190821\img-20210816-wa0033.jpg

महाराष्ट्र राज्य संघटनेची नवीन कार्याध्यक्ष जी.के .थोरात यांचा सत्कार करताना मान्यवर

Web Title: In the sanctity of the TDF movement to solve the problems of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.