दरोडप्रकरणातील वाळूमाफिया तीन वर्षानंतर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:50+5:302020-12-24T04:10:50+5:30
१३ मार्च २०१७ रोजी ५ वाजण्याच्या सुमारांस यवत ( ता. दौंड ) येथील शासकीय विश्रामगृहाचे परीसरात सुमारास महसूल विभागाचे ...
१३ मार्च २०१७ रोजी ५ वाजण्याच्या सुमारांस यवत ( ता. दौंड ) येथील शासकीय विश्रामगृहाचे परीसरात सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी शहाजी मारूती भंडलकर व काळुराम जगन्नाथ शेवाळे हे तहसिलदार यांनी चोरटी वाळु वाहतुक कारवाई करून जप्त केलेल्या २१ वाहनावर देखरेखीचे शासकीय कामकाज करीत होते. याठिकाणी रमेश शिंदे यांचेसमवेत राजकुमार संपत पवार ( वय २७, रा. गार अकोले, ता.माढा, जि.सोलापुर ), अमोल दत्तात्रय माकर ( वय २७, रा. गोकळी, ता.इंदापुर ), कृष्णा श्रीनिवास पाटील ( वय २४, रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापुर ) व इतर दोघे यांनी संगनमत करून ट्रक चोरून नेण्याचे उद्देशाने शासकीय विश्रामगृहामध्ये येवुन भंडलकर व शेवाळे यांना हाताने लाथाबुक्कांनी मारहाण करून जप्त केलेले १०,००,०००/- रू किमतीचे प्रत्येकी तीन ब्रास वाळुसह भरलेले दोन ट्रक नंबर एमएच.१२ एफझेड ४९५५ व एमएच १३ एएक्स ४५३८ हे वाळूसह शासकीय कामात अडथळा आणून दरोडा टाकुन पळवून नेले होते. यापूर्वी पवार, माकर व पाटील या तीन जणांना अटक करण्यात आलेली होती. यातील रमेश शिंदे हा बावडा अकलूज रोड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला मात्र, त्याला सापळा लावल्याचे समजताच त्याने धूम ठोकली पोलिसांनी त्याला अकलूज येथे पाठलाग करुन ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यास यवत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.