वाळूमाफियांचे धाबे दणाणले
By admin | Published: November 21, 2014 04:16 AM2014-11-21T04:16:14+5:302014-11-21T04:16:14+5:30
तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपशावर आठवडाभरापासून कारवाई सुरूच असल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
दौंड : तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपशावर आठवडाभरापासून कारवाई सुरूच असल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
रात्रीच्या सुमारास बेकायदा वाळू वाहतूक करणारे १0 ट्रक आणि २ ट्रॅक्टर पकडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली.
नदीच्या पात्रात वाळूमाफियांचा सुळसुळाट झाला होता. मात्र त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी महसूल खात्याचे पथक कार्यरत झाले असून त्या अंतर्गत वाळूमाफियांवर कारवाई केली जात असल्याचे दिघे यांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बढे, एम. बी. ठोंबरे, सुनील जाधव, डी. आर. यादव, महादेव माकर, भानुदास येडे यांच्या पथकाने रात्रीची गस्त घालून दौंड-पाटस रोडवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे १0 ट्रक पकडेल. दौंड येथील गाववेशी परिसरातील स्मशानभूमीच्या बाजूला एक ट्रॅक्टर ट्रॉली तर दौंड सिद्धटेक रोडवरील कचरा डेपोजवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली पकडण्यात आली आहे. पकडलेली सर्व वाहने जप्त करण्यात आली असून ही सर्व वाहने प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभी करण्यात आली आहेत. (वातार्हर)