पुण्यात मोठी दुर्घटना टळली! जे पी नड्डा आरतीला आलेले, साने गुरुजी तरुण मंडळाचा मांडव पेटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:33 PM2023-09-26T20:33:50+5:302023-09-26T20:34:33+5:30
आग लागल्याने नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
गणेशोत्सवासाठी पुण्यात छोट्या मोठ्या मंडळांनी भलेमोठे देखावे उभारले आहेत. यातच राजकीय नेतेमंडळी या मंडळांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच पुण्यात आज एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आरतीला आलेले असताना साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग लागल्याची घटना घडली होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आले होते. इथे महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंदिराच्या कळसाला आग लागली आणि मंडळ पदाधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
#WATCH | Pune, Maharashtra: Sane Guruji Tarun Mitra Mandal catches fire.
— ANI (@ANI) September 26, 2023
Details awaited. pic.twitter.com/N27zSpLi7Q
आग लागल्याने नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले आहे. तितक्यात पाऊस सुरु झाल्याने मंडपाला लागलेली आग विझली आणि मोठी दुर्घटना टळली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
#WATCH | Maharashtra | BJP national president JP Nadda offered prayers at the pandal designed by Sane Guruji Tarun Mandal Ganapati in Pune, on the model of Ujjain's Mahakal Temple. pic.twitter.com/ICzI0ScB3H
— ANI (@ANI) September 26, 2023