सणसवाडी-वसेवाडी शाळा बनली डिजिटल
By admin | Published: March 28, 2017 02:18 AM2017-03-28T02:18:49+5:302017-03-28T02:18:49+5:30
केंद्र शासनाने प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे धोरण आखले असल्याने सणसवाडी-वसेवाडी (ता. शिरूर) येथील
कोरेगाव भीमा : केंद्र शासनाने प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे धोरण आखले असल्याने सणसवाडी-वसेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी क्राफ्ट्समन आॅटोमेशन कारखान्याच्या वतीने दोन एलईडी स्क्रीन, फर्निचरसह संगणक कक्ष आदी पाच लाखांच्या विविध वस्तू देण्यात आल्या असून, गरजू विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून शिष्यवृत्तीही देण्यात येणार असल्याचे सांगितले.
वसेवाडी शाळेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी परराज्यातील आहेत. अशा परिस्थितीतही शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने शाळेकडे मुलांचा मोठा ओढा आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासात शाळेच्या १३ शिक्षकांचे योगदान मोठे असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थही शाळेच्या विकासात योगदान देत आहेत. ग्रामपंचायतीने शाळेस यापूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा, शुद्ध पाणी प्रकल्प देण्याबरोबरच शाळेची रंगरंगोटीही केली आहे. ग्रामपंचायत सदस्य रमेश सातपुते यांच्या पुढाकाराने शाळेस ‘सेको’ कारखान्याने नुकतेच शालेय साहित्यही भेट दिले होते.
वसेवाडी शाळेच्या गुणवत्तेचा आलेख पाहून क्राफ्ट्समन आॅटोमेशन कारखान्याने ५५ इंची दोन एलईडी स्मार्ट टीव्ही, ग्रंथालय पुस्तके, १२ टेबल, २२ खुर्च्या व संगणक कक्षास १ लाखाचे फर्निचर भेट दिले. या सर्व वस्तू कंपनीचे मुख्याधिकारी विष्णू गंग्रस यांच्या हस्ते शाळेस प्रदान करण्यात आल्या. या वेळी पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच वर्षा कानडे, दत्तात्रय हरगुडे, पंडित दरेकर, वैभव यादव, सोमनाथ दरेकर, रंगनाथ हरगुडे, नवनाथ हरगुडे, रमेश सातपुते, सुनीता दरेकर, नीता हरगुडे, सुनीता दरेकर, दीपाली हरगुडे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या वेळी कारखान्याचे अधिकारी जयंत चिकनगावकर, मनोज दिवटे, सुगुमार, मोहन कृष्णन, व्यंकट रमण, जी. आर. विश्वनाथन, मंदार देवासीस आदी उपस्थितांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बन्सिलाल ढगे, उपशिक्षक संतोष तांबे, नाथू ढेरे, कल्याणी उमाप, ज्योती गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार संतोष हरगुडे यांनी मानले.