राष्ट्रवादीत फुटीसाठी ‘संघ’नीती

By Admin | Published: September 23, 2015 03:25 AM2015-09-23T03:25:35+5:302015-09-23T03:25:35+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेची १०१७ ची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीच्या गडावर आपला झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे

'Sangh' strategy for the split of NCP | राष्ट्रवादीत फुटीसाठी ‘संघ’नीती

राष्ट्रवादीत फुटीसाठी ‘संघ’नीती

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची १०१७ ची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीच्या गडावर आपला झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेवर एकहाती सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्यासाठी ‘संघनीती’चा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर आणखी एका माजी आमदाराला भाजपकडून आवतण देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेल्या १५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. मात्र, केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यात महत्त्वाची मानली जाणारी पिंपरी-चिंचवड महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाच्या प्रदेशच्या नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे महिन्यात दोनवेळा विविध कार्यक्रमानिमित्ताने पिंपरीत येवून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचा गड पोखरण्यासाठी संघनितीप्रमाणे नियोजन सुरू आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांना शहरातील महत्वाची पदे देवून प्रवेशासाठी गळ घातली जात आहे. त्यासाठी शहराध्यक्ष व कार्यकारणीची निवड लांबणीवर टाकली आहे. भाजपाप्रमाणेच काँग्रेस व शिवसेनेने पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परंतु, पालिका प्रकल्पांच्या उद्घाटनाचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्षसंघटनेत दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sangh' strategy for the split of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.