पिंपरी-चिंचवड: 'धमक्यांची भीतीने केली आत्महत्या', पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर वाचला असता जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:47 PM2021-11-24T12:47:27+5:302021-11-24T13:03:58+5:30
अनेकदा विकास वानखेडे यांनी जीवे मारणे, धमक्या देणे या भीतीने शैलेंद्र कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात मयत यांच्या आई शोभा कांबळे यांनी तक्रार केली होती...
पिंपळे गुरव: सांगवी पोलीस ठाणे येथे दुपारी दोनच्या सुमारास मयत शैलेंद्र विरेंद्र कांबळे वय (वर्ष ३२), रा. ४०४, बालाजी कॉम्प्लेक्स देवकर पार्क सातफुटी रोड, पिंपळे गुरव. यांना रुग्णवाहिकेतून नातेवाईकांनी आणले होते. यावेळी दोन तास रुग्णवाहिका सांगवी पोलीस चौकीत उभी होती. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सांगवी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी नातेवाईकांशी संवाद साधला.
पिंपळे गुरव येथील मयत शैलेंद्र विरेंद्र कांबळे यांनी मंगळवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान रेंजहिल्स कॉर्नर येथील रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे समजते. यावेळी मयत शैलेंद्र कांबळे यांच्या आई शोभा विरेंद्र कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात दि. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी विकास वानखेडे (वय ४६), काम ड्रॉयव्हर, रा. फ्लॅट नं २०१ बालाजी कॉम्प्लेक्स, देवकर पार्क, सातफुटी रोड, पिंपळे गुरव यांच्या विरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
अनेकदा विकास वानखेडे यांनी जीवे मारणे, धमक्या देणे या भीतीने शैलेंद्र कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात मयत यांच्या आई शोभा कांबळे यांनी तक्रार केली होती. यावर सांगवी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. मात्र पुढील कारवाई विकास वानखेडे यांच्यावर काहीच न झाल्याने मयताचे नातेवाईक यांनी सांगवी पोलीस ठाण्यात मयत यास रुग्णवाहिकेतून आणले होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांना आम्हांस न्याय हवा. विकास वानखेडे यांना अजून का अटक केली नाही. आम्ही तक्रार करूनही सांगवी पोलिसांनी पुढील कारवाई करण्यास दिरंगाई का केली. वेळीच कारवाई केली असती तर आज शैलेंद्र जिवंत असता. असे नातेवाईक आयुक्तांकडे दाद मागत असताना दिसून आले.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी नातेवाईकांना धीर देत त्यांची समजूत काढून त्यांना तक्रारीची त्वरित दखल घेऊन विकास वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईक निघून गेले. यावेळी मयत यांचे धाकटे बंधू रितेश कांबळे (वय ३५), तसेच मयत यांची बहीण रागिणी कोरके यावेळी उपस्थित होते. मयत शैलेंद्र कांबळे हे विश्रांतवाडी येथे एक्सरे टेक्निशियन म्हणून खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करीत असत.