नीरेच्या प्रदूषणाबाबत सांगवीकरांचे पवारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:08 AM2019-02-23T04:08:58+5:302019-02-23T04:09:24+5:30
पाण्याचा प्रश्न गंभीर : पवारांनी केली नीरेच्या प्रदूषणाची पाहणी
सांगवी : दिवसेंदिवस नीरा नदीच्या प्रदूषणा बाबत गंभीर समस्या उद्भवत असून नीरा नदी काठच्या शेतकऱ्यांनी प्रशासना विरोधात आवाज उठवून त्यांच्या असंवेदनशील कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सांगवी ग्रामस्थांनी फलटण दौºयावर निघालेले माजी कृषी मंत्री शरद पवार यांना शुक्रवारी (दि.२२) रोजी सकाळी अकरा वाजता सांगवीत निवेदनाद्वारे लक्ष घालण्यासाठी साकडे घातले आहेत.
सांगवी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाणी प्रदूषणाची पहाणी करण्याची विनंती केल्याने त्याला प्रतिसाद देताना पवार यांनी देखील तातडीने बारामती फलटण रस्त्यावरील नीरा नदीच्या पूलावरून प्रदूषित झालेल्या पाण्याची प्रत्यक्ष पहाणी केली. तर प्रदूषित पाणी सोडून देणाºया संबंधीत संस्थांशी बोलून मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन याबाबत जातीने लक्ष घालून चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.
दिवसेंदिवस नीरा नदीच्या पाण्याचा विषय गंभीर स्वरूपाचा होत चालला आहे. फलटण तालुक्यातील खासगी कंपनी, कारखाने, कत्तलखाने यातून ओढ्यामार्फत कोणत्याही प्रकारे पाण्यावर प्रक्रिया न करता केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो शेतकºयांच्या शेती नापीक होण्याच्या मार्गावर असून, पाण्यावर मृत माश्यांचा खच मोठ्या प्रमाणात साचत असून याच पाण्याचा तीथक्याच प्रमाणात उग्र वास देखील येत होता. या पाण्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पाण्याच्या प्यायल्याने जनावरांनादेखील इजा होत आहे.
यावेळी राहुल तावरे, किरण तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकूले, पोपट तावरे आदी ग्रामस्थ
उपस्थित होते.
प्रदूषण न रोखल्यास निवडणुकीवर बहिष्कार
४प्रदुषणामुळे नदी काठचे हजारो शेतकºयांची शेती धोक्यात आली. त्यामुले शेतकºयांनी वारंवार प्रशासनाला लेखी निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. यामुळे ग्रामस्थांनी आगामी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पावीत्रा घेतला होता. त्याबाबत ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याकडेही हा इशारा दिला.