घोटवडेत सकाळी आठपासून स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:00+5:302021-09-17T04:15:00+5:30
सदर उपक्रमात ग्रामपंचायत परिसर, ग्रामदैवत रोकडेश्वर मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ...
सदर उपक्रमात ग्रामपंचायत परिसर, ग्रामदैवत रोकडेश्वर मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बाजारपेठ हनुमान चौक, शेळकेवाडी चौक व वाड्या-वस्त्यांवर जाऊन स्वच्छता करण्यात आली, स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. प्लास्टिक वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच राजाराम शेळके, ग्रामपंचायत सदस्य भिमाजी केसवड, नवनाथ भेगडे , संतोष गोडाबे , हनुमंत घोगरे ,संभाजी गोडाबे , सारिका खाणेकर , भाग्यश्री देवकर ,वैशाली कुंभार , निकिता घोगरे, मंगल गोडाबे, सोनाली मातेरे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉ. दीपाली कांबळे, सहकारी सुनील पावरा, अंगणवाडी शिक्षक मंगल भेगडे, शीतल घायतळे, सुनंदा डोळस, उज्वला भेगडे, आशा वर्कर्स शुभांगी केसवड, भाग्यश्री वायकर, वंदना भेगडे, देवकर, सुनीता मोरे, शोभा डुंबरे, विजयलक्ष्मी उंडे, रीना सोनी, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता भेगडे , गणेश दाभाडे , गोरक्ष घायतळे ,जनार्दन केसवड ,नीलेश कुंभार, लेखनिक दत्ता कुंभार, हेलमता भेगडे , सोनाली गाडे , हिना शेख , भुजंग गायकवाड, बेबी वैरागर, ग्रामस्थ संतोष भेगडे, रामचंद्र भेगडे, जयवंत मोरे, कोडिंबा चव्हाण, अजित भेगडे, शिवाजी देवकर, शिवाजी भेगडे उपस्थित होते अशी माहिती ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर यांनी दिली. तसेच चांदे येथेही अभियान राबविल्याची माहिती चांदे ग्रामपंचायत सरपंच अशोक ओव्हाळ यांनी दिली. परिसरातील मूलखेड, नांदे, भरे, रिहे, जवळ, खांबोली, पिंपळोली, कातरखंडक, आंधळे, मुगावडे या गावातही सदर उपक्रम यशस्वी राबविण्यात आला.