वालचंदनगरमध्ये स्वच्छता मोहिमेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:10+5:302021-02-08T04:10:10+5:30
वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांनी गावातील स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय ...
वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांनी गावातील स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हातात खराटा घेऊन या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. वालचंदनगरचे जुने वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.
रविवारपासून (दि.७) या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत परिसराची संपूर्ण स्वच्छता केली जाणार आहे. येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड मित्र मंडळाच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. वालचंदनगर परिसराचा गेल्या २० वर्षांपूर्वी मोठा नावलौकिक होता. मात्र तद्नंतर आलेल्या औद्योगिक मंदीमध्ये येथील अनेक नागरिक स्थलांतरित झाले. त्यामुळे हळूहळू येथील मूलभूत सुविधाही कमी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेऊन स्वखचार्तून परिसरातील स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अतुल तेरखडकर, डॉ. विकास शहा,अंबादास शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चौकट
सध्या या मोहिमेस सुरुवात झाली आहे. गावातील युवक रस्त्यांच्या बाजूचा कचरा गोळा करत आहेत. तर जेसीबीच्या साह्याने स्वच्छता केली जात आहे.
कोट
स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व असून गावचा परिसर स्वच्छ असल्यास गावाचा नावलौकिक मोठा होतो. स्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. युवकांनी सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असून इतरांनीही या मोहिमेत सामील होण्याची गरज आहे.
-दत्तात्रय भरणे, दरम्यान यावेळी बोलताना राज्यमंत्री.
---------------------
-------------------------