पर्यावरण प्रेमींकडून तळजाई टेकडीवर स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:39+5:302021-01-13T04:22:39+5:30
पुणे : नवीन वर्षात पर्यावरण रक्षण आणि जतन करण्याची शपथ घेत विविध संस्था आणि पर्यावरण प्रेमींनी तळजाई टेकडीवर स्वच्छता ...
पुणे : नवीन वर्षात पर्यावरण रक्षण आणि जतन करण्याची शपथ घेत विविध संस्था आणि पर्यावरण प्रेमींनी तळजाई टेकडीवर स्वच्छता मोहीम राबविली. टेकडी प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली.
तळजाई टेकडीवर घेतलेल्या आया अभियानात गुरुकृपा योग साधना गुप, तळजाई भमण मंडळ, योग मित्र मंडळ, स्वराज ॲकॅडमी, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल , जयनाथ तालीम मंडळ, युनिक ॲकॅडमी, लक्ष अकडमी या संस्था सहभागी झाल्या. उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुभाष जगताप होते. यावेळी संपतराव धोपटे, दिलीप दुर्वे, विलास खोपडे, अशोक पवार, आप्पा नांदे, मारूती जगताप, अरविंद नाईक, श्रीकांत गोसावी यांच्यासह टेकडीवर व्यायामाला व फिरावयास येणारे शेकडो नागरिक सहभागी झाले होते. लहान मुले, तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी कचरा गोळा करणे, प्लास्टिक उचलणे, झाडणे आदी कामे केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. तळजाई मंदिर टेकडी परिसर व तळजाई ऑक्सीजन पार्क या ठिकाणी राबविलेल्या स्वच्छता अभियानामुळे टेकडी कचरा व प्लास्टिकमुक्त केली. वर्षातून एकदाच अभियान न राबविता तळजाई टेकडी व तळजाई ऑक्सीजन पार्क हे कायमस्वरूपी प्लास्टिक मुक्त व स्वच्छ ठेवण्याकरिता दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प यावेळी केल्याचे नगरसेवक जगताप यांनी सांगितले.