चाकण येथील आदिवासी कातकरी वस्तीवर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:45+5:302021-08-12T04:14:45+5:30

चाकण नगरपरिषद हद्दीतील आदिवासी कातकरी पाड्यावर कलाविष्कार मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी ...

Sanitation campaign on tribal Katkari settlement at Chakan | चाकण येथील आदिवासी कातकरी वस्तीवर स्वच्छता मोहीम

चाकण येथील आदिवासी कातकरी वस्तीवर स्वच्छता मोहीम

Next

चाकण नगरपरिषद हद्दीतील आदिवासी कातकरी पाड्यावर कलाविष्कार मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात खराटे घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत आदिवासी बांधव आणि शाळकरी मुलेही सहभागी झाली होती.

पठारवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी येथील जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पाड्यावरच स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण करपे यांनी वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. कविता मुखिया यांनी आदिवासी महिलांना आरोग्या विषयी माहिती. अंनिसचे कार्यकर्ते व सर्पमित्र अतुल सवाखंडे व विशाखा गुप्ता यांनी प्रबोधनाची गीते सादर करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तर वसुंधरा संस्थेचे मनोहर शेवकरी यांनी येथील कुटुंबासाठी प्रत्येक आठवड्याला 'स्वच्छ कुटुंब स्पर्धा’ घेण्याचे जाहीर केले.

कलाविष्कार मंचचे उपाध्यक्ष विशाल बारवकर सामाजिक कार्यकर्ते सचिन आल्हाट, मयूर आगरकर यांनी घर व परिसरातील टाकाऊ वस्तू, केरकचरा, प्लास्टिक पिशव्या, कागद, पालापाचोळा जमा करून ओला व सुका कचरा वेगळा करून माहिती देण्यात आली. स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने महिला व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने सामील झाले होते. या सर्व कुटुंबांना मोफत खराटे देण्यात आले.

यावेळी चित्रणजन मुखिया, हर्षवर्धन थिटे, मनीष बानाटे, प्रज्ञा सवाखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मोहरे यांनी केले, तर आभार शिवाजी मुकणे यांनी मानले.कार्यक्रमा दरम्यान कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले होते.

फोटो - चाकणजवळील आदिवासी कातकरी वस्तीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Web Title: Sanitation campaign on tribal Katkari settlement at Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.