वारूळवाडीत स्वच्छता महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:25+5:302021-09-24T04:12:25+5:30
या अभियान उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके व वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. ...
या अभियान उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके व वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, उपसरपंच माया डोंगरे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, गुंजाळवाडी सरपंच रेश्मा वायकर, सदस्य जंगल कोल्हे, ज्योती संते, स्नेहल कांकरिया, राजश्री काळे, संगीता काळे, उद्योजक संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, आशिष माळवदकर, लोहकरे, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व आशा वर्कर्स आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. जुन्नर तालुका कृषी अधिकारी दिनेश बुधवंत व कृषी विस्तार अधिकारी अनुराधा मसे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
आशा बुचके म्हणाल्या की, देशातील महास्वच्छता अभियान प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहे. स्व. ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान व तंटामुक्ती या दोन अभिनव योजना राज्यासाठी दिल्या. ग्रामस्वच्छता अभियान संत गाडगे महाराज यांच्या नावाने राज्यात सुरू केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देशासाठी महास्वच्छता अभियान सुरू केले. वारूळवाडी ग्रामपंचायतीने हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेऊन चांगले काम सुरू केले आहे. महास्वच्छता अभियानामध्ये ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला. वारूळवाडी ग्रामपंचायत कार्यालय (जुनी इमारत) याठिकाणी ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, म्हणून आधार सेवा केंद्र चालू केले असून बुचके यांच्या हस्ते आधार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्तविक रामभाऊ सातपुते यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य जंगल कोल्हे यांनी मानले.
फोटो : वारूळवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता महाश्रमदान अभियानानिमित्त स्वच्छता अभियान उपक्रम राबविताना आशा बुचके व वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामपंचायत सदस्य.