संजय गांधी वसाहत : पाण्यामुळे आरोग्याची लागली वाट, नागरिकांच्या आरोग्याला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:55 AM2018-12-25T01:55:51+5:302018-12-25T01:56:00+5:30

पुणे शहरातील मनपाच्या वारजे क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या संजय गांधी वसाहतीमधील रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येत आहे.

Sanjay Gandhi Colony: Due to water shortage due to water, the risk of citizens' health | संजय गांधी वसाहत : पाण्यामुळे आरोग्याची लागली वाट, नागरिकांच्या आरोग्याला धोका

संजय गांधी वसाहत : पाण्यामुळे आरोग्याची लागली वाट, नागरिकांच्या आरोग्याला धोका

Next

पुणे : शहरातील मनपाच्या वारजे क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या संजय गांधी वसाहतीमधील रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अलंकार पूल येथील संजय गांधी वसाहतीमधील नागरिकांना पालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने नळावाटे अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. या पाण्यामध्ये प्रचंड कचरा स्पष्ट दिसून येत आहे. कपडे धुण्यासाठी या पाण्याचा वापर करणे कठीण झाले आहे, तर पिण्याचा प्रश्नच सोडा!
पालिकेकडून होणाºया अत्यंत दूषित पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, वृद्धांमध्ये पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ, हगवण अशा विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिकांनी पालिकेच्या अधिकाºयांकडे गेल्या सहा दिवसांत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. वारजे क्षेत्रीय कार्यालय एवढ्या जवळ असूनही या प्रकरणाची कुठलीही दखल पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाºयांकडून घेण्यात आलेली नाही. पालिका कर्मचाºयांच्या गारठलेल्या कारभाराविरुद्ध स्थानिक संताप व्यक्त करीत आहेत. येथील स्थानिक नगरसेवकदेखील या प्रकरणाकडे कानाडोळा करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वेळोवेळी संपर्क करूनसुद्धा नगरसेवक प्रतिसाद देत नाहीत. या प्रकारामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. आंदोलनाच्या तयारीत नागरिक आहेत. आत्यामुळे दूषित पाण्याने ग्रस्त असलेल्या या वसाहतीतील नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्नच आहे.

वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घाणेरड्या पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक या प्रश्नांबाबत गंभीर नाहीत. गेल्या सहा दिवसांपासून आरोग्यासोबत मानसिक त्रासाला येथिल नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
- तुकाराम येडके, स्थानिक

या वसाहतीमध्ये होणाºया पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मिळाल्यानंतर, संबंधित पालिका कर्मचाºयांना पाईपलाईन दुरुस्तीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. लकरच शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांना काही दिवस झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
- जयंत भावे, नगरसेवक म.न.पा.पुणे

आम्ही गेल्या चार दिवसांपासून या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. जलवाहिन्या जमिनीमध्ये खूप खोलवर गाडल्या गेल्या असल्यामुळे त्यामुळे नक्की कुठे सांडपाण्यामध्ये पिण्याचे पाणी मिसळले जात आहे, हे समजून येत नाही. या कामासाठी आम्ही तब्बल आठ कर्मचाºयांवर जबाबदारी सोपवली आहे. तरीदेखील आम्ही समस्येच्या मुळाशी जाण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत.
- संतोष लांजेकर, पाणीपुरवठा अधिकारी,
वारजे क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Sanjay Gandhi Colony: Due to water shortage due to water, the risk of citizens' health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी