संजय गांधी निराधार अनुदान योजनेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:00+5:302021-08-14T04:14:00+5:30
बारामती : येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत १४८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या ...
बारामती : येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत १४८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय भवन येथे बैठक पार पडली. त्या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सुनील बनसोडे यांनी ही माहिती दिली. बैठकीत संजय गांधी निराधार योजनेची १०८ व श्रावणबाळ योजनेची ५० तसेच इंदिरा गांधी योजनेतील ६ अशी एकूण लाभार्थींची १६४ प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी योजनेची १०२ प्रकरणे मंजूर व ६ नामंजूर करण्यात आली. तसेच श्रावणबाळ योजनेची ३८ प्रकरणे मंजूर व नामंजूर १२ आणि इंदिरा गांधी योजनातील सर्व ६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत एकूण १० प्रस्तावपैकी ८ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. पात्र लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या वेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, तहसीलदार विजय पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर, महादेवराव भोसले, संजय गांधी योजना समितीचे सदस्य सुनील बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, लालासो होळकर, नीलेश मदने, अशोक इंगोले व अव्वल कारकून सुरेश जराड आदी उपस्थित होते.